Miss Universe Harnaaz Sandhu new year dress : भारताला 21 वर्षांनंतर विश्वसुंदरीचा किताब मिळवून देणारी हरनाझ संधू सध्या चर्चेत आहे वेगळ्याच कारणाने… पाहा PHOTOS
मिस युनिव्हर्स 2021 किताब मिळवणाऱ्या हरनाझ संधूने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिनं फोटोंमध्ये तिने शॉर्ट ड्रेस घातलेला दिसत आहे. आणि त्या ड्रेसच्या किमतीचीच चर्चा आहे.
हरनाझ संधूने लॅव्हेंडर शर्ट आणि स्कर्ट परिधान केलेला आहे. या ऑर्गेन्झा शर्टच्या खांद्यावर रफल्स आहेत. लेस एम्ब्रॉयडरी आहे.
हरनाझ संधूने शर्टसोबत मॅचिंग स्कर्ट घातला आहे आणि त्यावर फ्लोरल प्रिंट आहे. हरनाझने तिच्या सुंदर पोशाखाला साजेसे बेज स्ट्रॅपी स्टिलेटोज घातले आहेत.
हरनाझ संधूचा हा पोशाख पंकज आणि निधी या डिझायनर्सनी डिझाइन केलेला आहे. त्यामुळं हा ड्रेस खूप महाग आहे.
या ड्रेसची किंमत पंकज आणि निधीच्या वेबसाइटवर देण्यात आलेली आहे. हरनाझच्या या ड्रेसची किंमत 35 हजार रुपये इतकी आहे.
हे फोटो शेअर करत हरनाझने लिहिले की, "2022 मध्ये पाऊल टाकत आहे.. चला प्रवास सुरू करूया."