JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मुशर्रफ यांच्या नातेवाईकाच्या मेहंदीमध्ये गायला हा भारतीय गायक, युझर्स म्हणाले- 'भिकाऱ्यांकडे गाणार का?'

मुशर्रफ यांच्या नातेवाईकाच्या मेहंदीमध्ये गायला हा भारतीय गायक, युझर्स म्हणाले- 'भिकाऱ्यांकडे गाणार का?'

भारत- पाकिस्तानचे संबंध खराब असताना मिकाने पाकिस्तानात कार्यक्रम केल्याचा आनंद असल्याचं पाकिस्तानी पत्रकार नायला इनायतने सांगितलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कराची, 12 ऑगस्ट- बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंगने (Mika Singh) पाकिस्तानातील (Pakistan) कराची (Karachi) येथे एक सिंगिंग परफॉर्मन्स दिला. पाकिस्तानची पत्रकार नायला इनायतने माजी पाकिस्तानी राष्ट्रपती जनरल परवेज मुशर्रफ यांच्या एका नातेवाईकाच्या मेहंदीचा कार्यक्रम असल्याचं म्हटलं. हे कळल्यानंतर भारतीय युझर्सने गायक मिका सिंगला सोशल मीडियावर खडेबोल सुनावले. रागावलेल्या युझर्सने मिकाला हा देशद्रोह असल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे जम्मू- काश्मीर येथून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने विरोध दर्शवत भारतासोबतचे व्यवसाय पूर्णपणे बंद केले होते. तसेच भारतीय सिनेमांवरही बंदी घातली आहे. भारत- पाकिस्तानचे संबंध बिघडले- सद्य परिस्थितीत भारत आणि पाकिस्तानचे संबंध तणावग्रस्त आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंत्री मंडळाची बैठक बोलावून भारताविरुद्ध युद्ध छेडण्याची आणि त्या नंतरच्या परिणामांची चर्चा केली. यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापार संबंध तोडले, तसेच समझौता एक्स्प्रेस आणि बस सेवांवरही बंदी घातली.

या परिस्थितीतही मिका सिंगने पाकिस्तानात जाऊन केला कार्यक्रम- एकीकडे पाकिस्तान, भारताची गळचेपी करू पाहत असताना बॉलिवूड कलाकार पाकिस्तानात जाऊन परफॉर्म करत आहेत. जावेद अख्तर यांच्यापासून ते गुलझार यांच्यापर्यंत अनेक कलाकार पाकिस्तानला गेले आहेत. पण सद्य परिस्थितीत दोन्ही देशांचे संबंध चिघळलेले आहेत. अशावेळी भारतीय कलाकार पाकिस्तानातील एका मेहंदीच्या कार्यक्रमात जाऊन गाणं योग्य आहे का असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे.

संबंधित बातम्या

पाकिस्तानी पत्रकारने लिहिले, मला आनंद आहे की मिका इथे आला भारत- पाकिस्तानचे संबंध खराब असताना मिकाने पाकिस्तानात कार्यक्रम केल्याचा आनंद असल्याचं पत्रकार नायला इनायतने सांगितलं. तिने ट्विटरवर लिहिले की, ‘मुशर्रफ यांच्या नातेवाईकाच्या मेहंदी कार्यक्रमात मिका सिंगला गाताना पाहताना मला आनंद होत आहे.’

जाहिरात
जाहिरात

मिका सिंगवर बहिष्कार टाकण्याची मागणी- पाकिस्तानात जाऊन मिकाने गाण्याचा कार्यक्रम केला, यासाठी त्याच्यावर बहिष्कार टाकण्यात यावा अशी मागणी सोशल मीडियावर केली जात आहे. एवढंच नाही तर मिका सिंगमुळे त्याचा भाऊ दलेर मेहंदीलाही ट्रोल करण्यात येत आहे. मानवी तस्करी प्रकरणात दलेर मेहंदीला याआधीच दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मिकाच्या पाकिस्तान दौऱ्यामुळे संपूर्ण कुटूंबत अपराधी असल्याचं अनेकांनी म्हटलं. ट्विटरवर मिकाच्या पाकिस्तानमधील कार्यक्रमाचा एक व्हिडिओ व्हायल झाला आहे. यावरूनच त्याला ट्रोल करण्यात आलं आहे. VIDEO पूरपरिस्थितीत तारतम्य न बाळगणाऱ्या ट्रोलर्सना सई ताम्हणकरनं ‘असं’ खडसावलं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या