JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सुपरस्टार छोटे उस्तादचं सूत्रसंचालन करणारी अवनी जोशी आहे तरी कोण?

सुपरस्टार छोटे उस्तादचं सूत्रसंचालन करणारी अवनी जोशी आहे तरी कोण?

स्टार प्रवाहवर संगीताचं नवं पर्व मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद (Mi Honar Superstar Chhote Ustaad) सुरु होतंय. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशीची( aniruddh joshi) मुलगी अवनी जोशी(avani joshi) या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 नोव्हेंबर : स्टार प्रवाहवर संगीताचं नवं पर्व मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद (Mi Honar Superstar Chhote Ustaad) सुरु होतंय . 5 ते 14 या वयोगटातील मुलांना या अनोख्या स्पर्धेत झळकण्याची संधी मिळणार आहे. 4 डिसेंबरपासून रात्री 9 वाजता हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशीची**( aniruddh joshi)** मुलगी अवनी जोशी**(avani joshi)** या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. अनिरुद्ध आणि त्याची पत्नी रसिका जोशी दोघंही शास्त्रीय गायक आहेत. त्यामुळेच अवनीमध्येही गायनाची आवड उपजत होतीच. सात वर्षांच्या अवनीला गाण्यासोबतच अभिनयाची देखील आवड आहे. अवनीच्या याच आवडीमुळे तिची मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या सूत्रसंचलनासाठी निवड झाली. अवनीसाठी हा नवा अनुभव असणार आहे. याआधी स्टार प्रवाहच्या साथ दे तू मला या मालिकेत अवनी बालकलाकाराच्या रुपात दिसली होती.

संबंधित बातम्या

मी होणार सुपरस्टारच्या सूत्रसंचलनासाठी ती खूपच उत्सुक आहे. नुकतंच सिद्धार्थ चांदेकरसोबत तिने या कार्यक्रमाचा प्रोमो शूटही केला. सेटवर ती बऱ्याच गोष्टींचं निरीक्षण करत असते. शूटचा मनमुराद आनंद लुटत असते. त्यामुळे मी होणार सुपरस्टारच्या मंचावर सिद्धार्थ चांदेकर आणि चिमुकल्या अवनीची भन्नाट केमिस्ट्री प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. तेव्हा 4 डिसेंबरपासून रात्री 9 वाजता पाहायला विसरु नका नवा कार्यक्रम मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद फक्त स्टार प्रवाहवर. वाचा :  विक्रम गोखलेंचे नाव न घेता अतुल कुलकर्णींचा निशाणा ; दोन शब्दाचं ट्वीट चर्चेत ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, गायक आदर्श शिंदे आणि गायिका वैशाली सामंत यांनी खास प्रोमो शूट केलाय. या प्रोमोसाठी या कलाकारांनी शाळेचा गणवेश परिधान केला. याच निमित्ताने या कलाकारांनी शाळेच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिलाय. या कार्यक्रमाच्या प्रोमोजसाठी या तिघांनीही शाळेचा गणवेश परिधान केला. भविष्यात जर सचिन पिळगावकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदे यांच्यासारखी उंच भरारी घ्यायची असेल तर ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’चा मंच तुम्हाला खुणावतोय अशी हटके थीम या प्रोमोसाठी वापरण्यात आली आहे. सचिन पिळगावकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदे यांना आजवर आपण वेगवेगळया रुपात भेटलो आहोत. मात्र अश्या रुपात पहाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या