JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'या' दिवशी रंगणार सुरांची मैफिल, 'मी वसंतराव' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

'या' दिवशी रंगणार सुरांची मैफिल, 'मी वसंतराव' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

ज्येष्ठ शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे(Dr.Vasantrao Deshpande) यांच्या जीवनावर आधारीत असलेला ‘मी वसंतराव’ (Me Vasantrao)चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जाहिरात

Me Vasantrao

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 फेब्रुवारी: ज्येष्ठ शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे (Dr.Vasantrao Deshpande) यांच्या जीवनावर आधारीत असलेला ‘मी वसंतराव’ (Me Vasantrao)चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच 1 एप्रिल 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जिओ स्टुडिओजचा पहिला मराठी चित्रपट आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ‘मी वसंतराव ’ या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले होते. मात्र या सिनेमाचा दिग्दर्शक निपुण अधिकारी यानं सोशल मीडियावरील आपल्या पोस्टच्या माध्यमातून हा चित्रपट नवीन वर्षात 1 एप्रिलला सिनेमागृहात भेटीस येत असल्याची घोषणा केली आहे.

संबंधित बातम्या

चित्रपटामध्ये वसंतराव देशपांडे यांची भूमिका त्यांच्या नातवाने म्हणजेच राहुल देशपांडेने साकारली आहे. राहुल देशपांडे व्यतिरिक्त चित्रपटामध्ये अनिता दाते, अमेय वाघ,पुष्करराज चिरपुटकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वसंतरावांनी त्यांच्या गायनाने अनेक वर्षे रसिकांच्या हृदयावर अधिराज्य केले आहे. ‘मी वसंतराव’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. पण आता लवकरच सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टीझरमध्ये वसंतरावांचे विचार, संगीतावरचं प्रेम आणि प्रत्येकवेळी घेतलेली खंबीर भूमिका यावर प्रकाश टाकण्यात आला होता. गोव्यात होणाऱ्या 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 2021 मध्ये ‘मी वसंतराव’ या चित्रपटाची निवड झाली होती. तसेच, आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजल्या गेलेल्या ‘कान्स’ चित्रपट महोत्सवातही या चित्रपटाची निवड झाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या