JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / पुन्हा #MeToo, अन्नू मलिकवर या गायिकेनं केला लैंगिक गैरवर्तनाचा आरोप

पुन्हा #MeToo, अन्नू मलिकवर या गायिकेनं केला लैंगिक गैरवर्तनाचा आरोप

त्यांना भेटायला गेले असताना तो सोफ्यावर झोपलेला होता आणि माझ्या डोळ्यांविषयी चर्चा करत होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 31 ऑक्टोंबर : वर्षभरापूर्वी #MeTooने बॉलिवूडमध्ये वादळ निर्माण झालं होतं. अनेक महिला कलाकारांनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केल्याने खळबळ उडाली होती. यात अनेक प्रतिष्ठीत अभिनेत्यांवर आरोप झाले होते. त्यामुळे अनेकांना आरोपांचा सामना करावा लागला. सर्वात आधी अमेरिकेत #MeToo ची चळवळ सुरू झाली होती. त्या चळवणीने हॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती. बॉलिवूडचा आघाडीचा गायक अनु मलिक (Anu Malik) यांच्यावरही आरोप झाले होते. ते वादळ शांत झाल्यानंतर आता पुन्हा एकदा #MeToo चं वादळ आलं असून गायिका नेहा भसीनने (Neha Bhasin) अन्नू मलिकवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केलाय. या आधी सोना महापात्रा (sona Mohapatra) आणि श्‍वेता पंडित यांनी अन्नू मलिकवर Me Too चळवळीत आरोप केले होते. महापात्रा यांनी एक ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली होती की महालांच्या सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण होण्यासाठी काय ‘निर्भया’सारखीच घटना घडायला पाहिजे का? त्या ट्विटला उत्तर देताना नेहाने तिच्यावर आलेला प्रसंग सांगितलाय. पण यावर अन्नू मलिक यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. ती प्रतिक्रिया आल्यानंतर त्यांचीही बाजू समोर येणार आहे.

दीपिका पदुकोण ते सनी लिओनी, ‘ही’ आहेत तुमच्या लाडक्या स्टार्सच्या भीतीची कारणं

नेहाने सांगितलं की ती 21 वर्षांची असताना एका गाण्याची सीडी देण्यासाठी अन्नू मलिकला भेटली होती. त्यावेळी ती नवखी होती तर अन्नू प्रसिद्धीच्या शिखरावर होता. त्यांना भेटायला गेले असताना तो सोफ्यावर झोपलेला होता आणि माझ्या डोळ्यांविषयी चर्चा करत होता. त्याचं सर्वच वागणं अत्यंत आक्षेपार्ह होतं. मला ते मुळीच पटलं नाही. त्यामुळे खोटं कारण सांगून मी तिथून पळून गेले.

जाहिरात

बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्याला करायचाय अक्षय कुमारचा बायोपिक

माझ्या आईने बोलावल्याचं कारण सांगून मी तिथून पळाले. मात्र नंतरही अन्नू  मलिकने माझा पिच्छा सोडला नाही. तो नंतरही SMS करतच राहिला मात्र मी त्याला उत्तर देण्याच्या भानगडीत पडले नाही असंही तिने म्हटलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या