Rasika Sunil
मुंबई, 19 ऑगस्ट : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या मनात एक घर करुन गेली. या मालिकेप्रमाणेच मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनीलनं (Rasika Sunil)तिच्या अभियानं सगळ्यांची मनं जिंकली होती. खलनायिकेची भूमिका साकारूनसुद्धा तिला प्रेक्षकांकडून अफाट प्रेम मिळालं होतं. तिची ही भूमिका प्रचंड गाजली. त्यानंतरपासून ती सतत चर्चेत असते. अशातच शनाया म्हणजेच रसिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगलीये. रसिका सुनीलनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिचा बोल्ड लुक दिसतोय. या फोटोला रसिकानं रंजक असं कॅप्शन दिलं आहे. ‘मी माझं संपूर्ण आयुष्य समुद्रावर किंवा समुद्राखाली घालवू शकते’, असं रसिकानं म्हटलंय. तिच्या या फोटोवर अनेक भन्नाट कमेंटचा पाऊस पहायला मिळतोय. रसिकाचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
‘फिलिंग हॉट हॉट, समुद्रात वायफाय नसणार इन्स्टावर फोटो पोस्ट करायला, फारच सुंदर, नको ग बाई! खारट पाणी प्यावे लागेल’, अशा अनेक कमेंट नेटकरी करत आहेत. ती सतत आपले ग्लॅमरस फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. रसिका विविध माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. . चाहते तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरुन प्रेम देत असतात. तिच्या प्रत्येक पोस्ट व्हायरल होत असतात. हेही वाचा - ‘और कितना गिरोगी’; पडता पडता वाचली Uorfi javed, पाहा VIDEO दरम्यान, रसिका सुनील हिने गेल्यावर्षी 18 ऑक्टोबर रोजी तिच्या लाँग टाइम बॉयफ्रेंडशी लग्न केलं. लॉस एंजलिसमध्ये राहणाऱ्या औरंगाबादकर आदित्य बिलागीसोबत तिनं लग्नगाठ बांधली. रसिका आणि आदित्य अनेकदा रोमँटिक फोटोज शेअर करत असतात. दोघेही कपल गोल्स देताना दिसतात.