JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / लग्नाला झाला एक महिना! जुईलीनं शेअर केला नवरा रोहितसोबतचा बेडरूम Video

लग्नाला झाला एक महिना! जुईलीनं शेअर केला नवरा रोहितसोबतचा बेडरूम Video

मराठी संगीत विश्वातील कुलेस्ट कपल रोहित राऊत (Rohit Raut) आणि जुईली जोगळेकर (Juilee Jogalekar) यांनी 23 जानेवारीला लग्नगाठ बांधली. आज त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 फेब्रुवारी- मराठी संगीत विश्वातील कुलेस्ट कपल रोहित राऊत (Rohit Raut) आणि जुईली जोगळेकर (Juilee Jogalekar) यांनी 23 जानेवारीला लग्नगाठ बांधली. पुण्यातील ढेपे वाड्यात पारंपारिक पद्धतीनं या दोघांनी लग्नगाठ (Juilee Jogalekar and Rohit Raut wedding) बांधली आहे. आज त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. यानिमित्त जुईली जोगळेकरने रोहितसोबतचा एक बेडरूम व्हिडिओ शेअर केला आहे. रोहिता आणि जुईली यांच्या लग्नाल एक महिना (1 month anniversary) आज पूर्ण झाला आहे. यानिमित्त पत्नी जुईलीने रोहितचा एक बेडरूम व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सकाळचा आहे. जुईली रोहितला उठवायचा प्रयत्न करत आहे. यावर रोहित म्हणत आहे की, फक्त दोन मिनिट..आणि नंतर त परत झोपताना दिसत आहे. जुईलीने म्हटलं आहे की, Yep! 1 month! #1monthanniversary.एक महिना झाला आहे असं तिनं म्हटलं आहे. वाचा-  महेश मांजरेकरांची मुलगी सई ‘या’ प्रसिद्ध निर्मात्याच्या मुलाला करतेय डेट जुईलीच्या या फनी व्हिडिओवर चाहत्यांकडून भन्नाट कमेंटचा वर्षाव होत आहे. एकाने म्हटलं आहे की, रोहित दादा ऊठ नाहीतर काठिने बडबुन काढेल जुईली ताई..तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, पाणी टाक थंड… काही चाहत्यांनी त्याला झोपू दे थोडावेळ असं देखील म्हटलं आहे. तसेच या जोडप्याला लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याबद्दल अनेकांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

मराठीतील हे कुलेस्ट कपल सोशल मीडियावर नेहमी फोटो शेअर करत असते. रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरची पहिली भेट ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ च्या मंचावर झाली होती. यानंतर मैत्री आणि नंतर डेटिंग आण आता दोघे आयुष्यभरासाठी लग्नाच्या बंधनात अडकले आहेत.जुईली नव्या पिढीची गायिका आहे. जुईलीचे सोशल मीडियावर देखील खूप चाहते आहेत. शिवाय तिचं युट्यूब चॅनेल देखील आहे. रोहितचा देखील सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग आहे. विशेषकरून त्याची तरूणींमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळते. या दोघांचा लग्नसोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर, कर्तिकी गायकवाड यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या