JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / मराठीतल्या या अभिनेत्रींचे आहेत स्वतःचे मोठे ब्रँड! अभिनयासोबत दिमाखात करतात business!

मराठीतल्या या अभिनेत्रींचे आहेत स्वतःचे मोठे ब्रँड! अभिनयासोबत दिमाखात करतात business!

मराठीमध्ये आघाडीच्या असणाऱ्या अनेक अभिनेत्री अभिनयाव्यतिरिक्त आपली आवड व्यवसायाच्या माध्यमातून जोपासताना दिसतात. प्रिया बापट (Priya Bapat) आपल्या ब्रँडला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल व्यक्त होताना दिसली. तिच्या व्यतिरिक्त कोणत्या अभिनेत्री व्यवसाय क्षेत्रात उतरल्या आहेत?

0108

प्रिया बापट आणि तिची बहीण श्वेता यांचा सावेंची असा ब्रँड आहे. हा एक साडीचा ब्रँड असून याला मिळणाऱ्या तुफान प्रतिसादाबद्दल प्रिया भलतीच खुश आहे.

जाहिरात
0208

सई ताम्हणकर सुद्धा स्वतःचा साडीचा ब्रँड चालवते. 'द सारी स्टोरी' असं या ब्रॅन्डचं नाव आहे.

जाहिरात
0308

तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे यांच्या तेजाज्ञा या ब्रँडला विसरून चालणार नाही. खण आणि महाराष्ट्रातील पारंपरिक पद्धतीच्या कापडांचे कुर्ते आणि साड्या इथे उपलब्ध आहेत. नुकत्याच या ब्रँडला 7 वर्ष पूर्ण झाली.

जाहिरात
0408

आरती वडगबाळकर या अभिनेत्रीचा सुद्धा 'कलरछाप' नावाचा स्वतःचा ब्रँड आहे. सुटसुटीत कॉटनचे ड्रेस, साड्या ही त्यांची खासियत आहे.

जाहिरात
0508

अभिनेत्री पूजा ठोंबरेने नवीनच कपड्यांचा ब्रँड सुरु केला आहे. 'त्रिणी बाय 3'असं त्याचं नाव आहे.

जाहिरात
0608

गिरीजा ओक-गोडबोले या अभिनेत्रीने सुद्धा अत्यंत भन्नाट असा 'फ्रेश लाईम सोडा' नावाचा कपड्यांचा ब्रँड सुरु केला आहे.

जाहिरात
0708

अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा सुद्धा स्वतःचा ब्रँड असून 'हंसगामिनी' असं त्याचं नाव आहे.

जाहिरात
0808

क्रांती रेडकरने आपल्या मुलीच्या नावाने 'झिया-झ्यादा' नावाचा ब्रँड सुरु केला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या