मुंबई, 12 फेब्रुवारी- मराठी अभिनेत्री तेजा देवकर ( tejaa deokar) हिच्या वडिलांचे निधन झाले आहे. तेजाचे वडील सुरेश देवकर यांचे 17 जानेवारी रोजी निधन झाले आहे. वडिलांच्या आठवणीशिवाय एकही दिवस जात नाही असे म्हणत तिने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यासोबतच तिनं वडिलांसोबतचे काही फोटो देखील शेअर केले आहे. तेजा देवकरने इन्स्टावर पोस्ट करत म्हटलं आहे की, वडील असतात…त्यात काय विशेष…पण ते नसतात तेव्हा काय ….. हे आज कळलं.त्यांचा आधार असतोच…पण ते नसतात तेव्हा काय …. हे आज कळलं…अशी भावनिक पोस्ट तिनं वडिलांच्या आठवणीत शेअर केली आहे.
तेजा देवकरचे वडील सुरेश देवकर हे मुंबईत बीजनेसमन होते. तेजा देवकरने हिरवं कुंकू या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. ऑक्सिजन, चल धर पकड, खंडोबाचं लगीन, अदला बदली, सासूचं स्वयंवर, राधिका, नाती, वृंदावन, कुलस्वामिनी, माय लेक, एक झुंज वादळाशी अशा चित्रपट तसेच टीव्ही मालिकांमधून तेजाने मुख्य भूमिका निभावल्या आहेत. शंभू माझा नवसाचा या चित्रपटात तेजाने विरोधी भूमिका साकारली होता. तेजाच्या आईने म्हणजेच नीता देवकर यांनी ऑक्सिजन या चित्रपटाचे कथालेखन केले होत. ऑक्सिजन या चित्रपटात तेजाने मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती. आता बऱ्याद दिवसांपासून कोणत्या नवीन प्रोजक्टमध्ये दिसलेली नाही. वाचा- नकुशी मालिकेतील अभिनेत्रीचं पार पडलं लग्न, आता परदेशात होणार स्थायिक? तेजा देवकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिची विविध फोटो व व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. फोटोशुटमुळे ती सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.