JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Mazi Tuzi Reshimgathi फेम नेहाची रिअल लाईफ नवऱ्यााठी खास पोस्ट; रोमॅंटिक Video शेअर करत म्हणाली..

Mazi Tuzi Reshimgathi फेम नेहाची रिअल लाईफ नवऱ्यााठी खास पोस्ट; रोमॅंटिक Video शेअर करत म्हणाली..

माझी तुझी रेशीमगाठ फेम नेहा म्हणजे प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) हिच्या नवऱ्याचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त तिनं नवऱ्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे सोबत व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 जानेवारी- अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. प्रार्थना तिचे काही फोटो व व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आज मात्र तिनं एक पोस्ट केली आहे. ही खास पोस्ट दुसऱ्या कुणासाठी नाही तर तिच्या नवऱ्यासाठी आहे. कारण तिच्या नवऱ्याचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त तिनं नवऱ्यासोबत**( abhishek jawkar birthday )** रोमॅंटिक व्हिडिओ शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रार्थना बेहरेने इंस्टाग्रामवर नवरा अभिषेक जावकरसोबतच एक रोमॅंटिक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने म्हटलं आहे की, माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुझ्यापासून सुरू होते आणि प्रत्येक गोष्ट तुझ्या नावावर येऊन संपते. तू नेहमीच माझ्यासाठी खास राहशील. माझं तुझ्यावर प्रेम आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझा हॅण्डसम नवरा. प्रार्थनाच्या या पोस्टवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत शुभेच्छा देत आहेत. वाचा- Indian Idol मराठीचं सूत्रसंचालन आता स्वानंदी नाही तर करणार ही अभिनेत्री या व्हिडिओत प्रार्थना आणि नवऱ्यासोबत क्वॉलिटी टाईम स्पेंड करतान दिसत आहे. दोघेही रोमॅंटिक मूडमध्ये दिसत आहे. प्रार्थना नवऱ्यासोबतचे देखील काही व्हिडिओ शेअर करत असते. प्रार्थनाने ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मितवा’ ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’, ‘फुगे’, ‘व्हाट्सअँप लग्न’ या गाजलेल्या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली.  प्रार्थना सध्या झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ**( mazi tuzi reshimgathi )** या मालिकेत नेहाची भूमिका साकारत आहे. तिच्यासोबत या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे देखील मुख्य भूमिकेत दिसत आहे. आता मालिका एक वेगळ्या वळणावर आहे. नेहाला यशचे सत्य समजले आहे. त्यामुळे नेहा आणि यशच्या मैत्रित दुरावा आला आहे. मात्र यश पुन्हा तिचा विश्वास मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

संबंधित बातम्या

प्रार्थना बेहेरेचे अरेंज मॅरेज आहे. प्रार्थनाने आपल्या आई-वडिलांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केले आहे. एका मॅरेज ब्युरोच्या मदतीने प्रार्थना बेहेरे आणि अभिषेक जावकर यांची ओळख झाली. त्यानंतर प्रार्थना आणि अभिषेक 14 नोव्हेंबर 2017 मध्ये विवाहबंधनात अडकले. गोव्यामध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. प्रार्थना आणि अभिषेक मराठी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल म्हणून देखील ओळखले जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या