JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'पण आता लग्नानंतर ..'लेकाच्या वाढदिवसानिमित्त मृणाल कुलकर्णी यांनी दिला खास सल्ला, पोस्ट चर्चेत

'पण आता लग्नानंतर ..'लेकाच्या वाढदिवसानिमित्त मृणाल कुलकर्णी यांनी दिला खास सल्ला, पोस्ट चर्चेत

‘माझा होशील ना’ या मालिकेमधून घराघरात पोहोचलेला मराठमोळा अभिनेता विराजस कुलकर्णी याचा आज वाढदिवस आहे. या सगळ्यात त्याची आई म्हणजे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी सोशल मीडिया पोस्ट करत त्याला एक खास सल्ला दिला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 फेब्रुवारी- ‘माझा होशील ना’ या मालिकेमधून घराघरात पोहोचलेला मराठमोळा अभिनेता विराजस कुलकर्णी याचा आज वाढदिवस आहे. चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या सगळ्यात त्याची आई म्हणजे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी सोशल मीडिया पोस्ट करत त्याला एक खास सल्ला दिला आहे. मृणाल कुलकर्णी यांनी विराजसचा एक फोटो शेअर करत लिहिलं आहे की, “प्रिय विराजस , आमचा शहाणा मुलगा तर तू आहेसच,पण आता लग्नानंतर “बॅलन्सिंग ऍक्ट” पण तू मस्त पार पाडतो आहेस. यावर्षी तुझा पहिला सिनेमा रिलीज झाला, त्याला यश मिळाले , सर्व थरातील लोकांनी त्याची नोंद घेतली, याचा खूप अभिमान वाटतो. तू येणाऱ्या वर्षी जे जे प्लॅन केलं आहेस ते सर्व उत्तम रीतीने पार पडो आणि त्यात तुला भरघोस यश मिळो. शिवानी आणि तुला खूप प्रेम …Happy Birthday!!! PS : आता तरी थोडासा केक खायला लाग ! आई – बाबा. मृणाल यांनी लेकासाठी लिहिलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या दिग्गज अभिनेत्री आहेत. राजा शिवछत्रपती किंवा फर्जंद मधील आई जिजाऊ असोत, लढवय्यी अवंतिका असो वा मुलांना मदत करणारी सोनपरी. विविध शेड्स असणाऱ्या भूमिका मृणाल यांनी अगदी लीलया साकारल्या आहेत.मृणाल आजही वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहेत. पण कितीही बिझी असल्या तरी कुटुंबासाठी त्या आवर्जुन वेळ देतात. त्यांच्या कुटुंबाचे अनेक फोटो त्या शेअर करताना दिसतात.

झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेमधून पदार्पण केलेला प्रसिद्ध अभिनेता विराजस कुलकर्णी काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. अभिनयाच्या जोरावर त्यानं त्याचा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. विराजस सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो आणि वेगवेगळे फोटो शेअर करत असतो. हा अभिनेता उत्तम अभिनय तर करतोच त्याने दिग्दर्शन क्षेत्रात देखील पदार्पण केले आहे.

विराजस आणि शिवानी ही जोडी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. त्या दोघांचा विवाहसोहळा अगदी पारंपारिक पद्धतीने पार पडला होता. त्यावेळी दोघांनीही दाक्षिणात्य पद्धतीची वेशभूषा केली होती. अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर 3 मे 2022 रोजी विराजस-शिवानी विवाहबंधनात अडकले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या