मुंबई, 16 नोव्हेंबर- शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर खंडणीचे आरोप झाल्यामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आरोप करण काही थांबवलेले नाही. नवाब मलिक यांनी आज वानखेडे यांच्यावर पुन्हा नव्याने आरोप केला आहे. तर, दुसरीकडं वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिनं नांदेड व जळगावमध्ये एनसीबीनं केलेल्या कारवाईवरून एक खोचक ट्वीट केलं आहे. सध्या क्रांतीचे हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आलं आहे. क्रांतीने ट्विट करत म्हटलं आहे की, आहे. ‘ना रुकेंगे, ना थमेंगे…’ तिचं दोन ओळीचं हे ट्वीट सोशल मीडिावर चांगलंच चर्चेत आलं आहे. समीर वानखेडे यांच्यावर आरोप करणाऱ्यांना हा टोला असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे.
1500 किलो गांजा जप्त मुंबई एनसीबीच्या पथकानं जळगाव जिल्ह्यातील एरंडोल इथं कारवाई करून1500 किलो गांजा जप्त केला आहे. हा गांजा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आणला गेला होता. या प्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. याशिवाय, नांदेड जिल्ह्यात एनसीबीच्या पथकानं धडक कारवाई करत 1100 किलो गांजा जप्त केला आहे. यात एका ट्रकमधून गांजाची पोती जप्त करण्यात आली आहेत. दोघा संशयित तस्करांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. समीर वानखेडे यांनीच या कारवाईबद्दल माहिती दिली आहे. वाचा : ‘आता पद्म पुरस्कार येणार..’, स्वरा भास्करचा विक्रम गोखलेंवर निशाणा नवाब मलिक यांचे आरोप क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणावरुन (Mumbai Cruise drug case) राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा एनसीबी आणि समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांनी व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिकांनी म्हटलं की, के पी गोसावी आणि मनिष भानुशाली हे मुख्य भूमिकेत होते. दिल्लीतून ज्या खबऱ्याने काही फोटोज, काही नावं पाठवले होते त्यात काशिफ खान याचंही वाव होतं. वाचा : PHOTO: ऋता दुर्गुळेचे लाल ड्रेसमधले फोटो पाहून खरंच ‘मन उडू उडू’ होईल! काशिफ खान याचा फोटोही के पी गोसावीला शेअर केला होता. काशिफ कान हा क्रूझवर गेला होता आणि त्याच्यासोबत दुबईतील एक व्यक्ती होता मात्र, समीर वानखेडेंनी त्यांना ताब्यात घेतले नाही. गोसावी त्याला सांगताय फोटो पाठवा काशीफ खानचा फोटो पाठवण्यात आला आणि या पद्धतीने फोटोच्या आधारावर लोकांना ओळख करून ताब्यात घेण्यात आलं. या पद्धतीने काशिफला का ताब्यात घेतलं नाही? त्यालाच का सूट देण्यात आली? तो क्रूज वर दोन दिवस काय करत होता? इतके दिवस करवाई का केली नाही..असे अनेक प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केले आहेत.