JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ते देवाघरी गेले..म्हणत क्रांती रेडकरची मुलगी लागली रडू, प्रॉब्लेम झाला म्हणत अभिनेत्रीनं शेअर केला VIDEO

ते देवाघरी गेले..म्हणत क्रांती रेडकरची मुलगी लागली रडू, प्रॉब्लेम झाला म्हणत अभिनेत्रीनं शेअर केला VIDEO

क्रांतीनं एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तिची मुलगी घरात एक वाईट प्रसंग घडला म्हणून रडत आहे. नेमकं असं काय झालं आहे , ज्यामुळं क्रांतीची मुलगी धाय मोकलून रडत आहे

जाहिरात

ते देवाघरी गेले का..म्हणत क्रांती रेडकरची मुलगी लागली रडू

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 जून- मागच्या काही दिवसांपसून नवरा समीर वानखेडे यांच्या समर्थनात मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर काही व्हिडिओ शेअर करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून क्रांती एक संदेश देण्याचा प्रयत्न करत आली आहे. अशातच क्रांतीनं एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तिची मुलगी घरात एक वाईट प्रसंग घडला म्हणून रडत आहे. नेमकं असं काय झालं आहे , ज्यामुळं क्रांतीची मुलगी धाय मोकलून रडत आहे. क्रांती मात्र तिची समजून काढताना दिसत आहे. पण नेमकं असं काय झालं आहे, ज्यामुळं क्रांतीची मुलगी इतकी दुःखात आहे. मराठमोळी अभिनेत्रीक्रांती रेडकरसोशल मीडियावर भन्नाट रील शेअर करताना दिसते. तिचे रील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. या रीलच्या माध्यमातून ती चाहत्यांचे नेहमीच मनोरंजन करताना दिसते. क्रांतीन नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये क्रांती म्हणत आहे की खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आम्ही आता फ्रोझन बघितलय आणि आता एलसा आणि अनियाचे आई वडील वारले आहेत..याचं दुःख माझी मुलगी छबीलला झालं आहे..त्यामुळं क्रांती तिची समजोत काढत आहे.

क्रांती म्हणत आहे की, तुझे आई वडील आहेत ना तुझ्यासोबत मग तू रडू नको. पण मुलगी छबील काही केल्या ऐकेना..ती मध्येच विचारत आहेत ते देवा घरी गेले का..? घरी का गेले नाहीत..पण क्रांती तिची समजून काढत आहे..बोटीतून जाताना टॉम आला आणि त्यांना घेऊन गेला..असं करून क्रांती मुलगीची समजून काढत आहे. पण मुलगी धाय मोकलून रडत आहे. तर दुसऱ्या मुलगीला याचा काहीस फरक पडत नाही,,ती ममाकडे अॅपल ज्यूस मागत आहे..हा गमतीचा भाग आहे. क्रांतीची मुलगी कार्टून पाहून रडू लागले आहे…क्रांतीच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी तिच्या मुलीची समजूत काढायचा प्रयत्न केला आहे.

संबंधित बातम्या

क्रांती रेडकरला दोन जुळ्याच्या मुली आहेत. एकीला लाडानं ती गोदो तर दुसरील छबील असं म्हणते. तिच्या मुलींचा चेहरा आजपर्यंत तिनं कोणत्याच व्हिडिओवर पोस्ट केलेला नाही. मात्र त्यांचे असे काही व्हिडिओ ती शेअर करत असते. मुलींच्या अशाच काही मजेशीर गोष्टी क्रांती चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. क्रांतीनं आजपर्यंत तिच्या मुलींची झलक सोशल मीडियावर दाखवलेली नाही. नेहमीच ती मुलीं व्हिडिओत दिसणार नाही याची काळजी घेताना दिसते. पण मुलीचें असेच काही भन्नाट किस्से शेअर करत असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या