JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'तू जिथं जाशील तिथं...', साखरपुड्याच्या दोन दिवसांनी Hruta Durgule ची प्रतीकसाठी खास पोस्ट

'तू जिथं जाशील तिथं...', साखरपुड्याच्या दोन दिवसांनी Hruta Durgule ची प्रतीकसाठी खास पोस्ट

ऋता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि प्रियकर प्रतीक शाह (Prateek Shah) यांचा साखरपुडा (Hruta Durgule Engagement) 24 डिसेंबर रोजी मोठ्या थाटात पार पडला आहे. आता साखरपुड्यानंतर ऋताने होणाऱ्या नवरदेवासाठी पहिली सोशल मीडिया पोस्ट केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 डिसेंबर-  मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि प्रियकर प्रतीक शाह (Prateek Shah) यांचा साखरपुडा (Hruta Durgule Engagement) 24 डिसेंबर रोजी मोठ्या थाटात पार पडला आहे. आता साखरपुड्यानंतर ऋताने होणाऱ्या नवरदेवासाठी पहिली सोशल मीडिया पोस्ट केली आहे. तिनं यासोबत प्रतिकसोबतचा एक रोमॅण्टिक फोटो देखील शेअर केला आहे. प्रतीक शाह (Prateek Shah Birthday) चा वाढदिवस आहे. यानिमित्तच ऋताने त्याच्या खास पोस्ट लिहित त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं पोस्टमध्ये म्हटले आहे की, वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मिस्टर शाह..माझ्याकडून तुला खुप खुप प्रेम ..happiness , luck and positivity. तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य  नेहमी असेच राहुदे.  तू जिथं जाशील तिथं तुझ्या चेहऱ्यावरचे तेज असेच राहुदे…   प्रेम आणि फक्त तुझ्यासाठी प्रेम ❤️..असं म्हणत तिनं प्रतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. साखरपुड्यानंतर तिची ही पहिली पोस्ट आहे. अधिकृतपणे नाते जाहीर केल्यानंतर तिनं पहिल्यांदाच अशी रोमॅण्टिक पोस्ट शेअर केली आहे. चाहत्यांकडूनही प्रतिकवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाचा- महेश मांजरेकरांकडून मोठी घोषणा, विजेता होण्यापूर्वीच दिली ‘ही’ ऑफर ऋता दुर्गुळेनं साखरपुड्याच्या आधी काही दिवसांपूर्व रिलेशनशिपमध्ये असल्याची घोषणा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. दिग्दर्शक प्रतीक शाहला ती डेट करत असल्याचे तिनं सांगितले होते . प्रतीक आणि ऋता सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करताना दिसत असतात. साखरपुड्याचे फोटो देखील त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

संबंधित बातम्या

प्रतीक हा हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. त्याने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘तेरी मेरी इक जिंदडी’, ‘बेहद २’, ‘बहु बेगम’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’, ‘एक दिवाना था’ यांसारख्या मालिकांचं दिग्दर्शन प्रतीकने केलं आहे. वाचा- बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर तरी विशाल उलगडणार का ‘सौंदर्या’चे राज? मास मीडिया या पदवी अभ्यासक्रमातील जाहिरात क्षेत्रात शिक्षण घेतलेली अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिच्या ‘दुर्वा’ या मालिकेतून सर्वांसमोर आली. या मालिकेनं जवळपास हजार भागांचा टप्पा पूर्ण केला होता. त्यानंतर ती ‘फुलपाखरू’ मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती. तिची क्रेज पाहता मराठी अभिनेत्रींमध्ये सोशल मीडियावर सर्वात जास्त लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिले जाते.सध्या ती मन उडू उडू झालं या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या