मुंबई, 24 डिसेंबर- मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे (Hruta Durgule) लवकरच प्रियकर प्रतीक शाहसोबत (Prateek Shah) साखरपुडा करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. यासाठी ऋताने दोन्ही हातांवर सुंदर मेंदी काढली असून त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तसेच तिनं BRIDAL फेसपॅकचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यामुळे ती लग्न करणार आहे की साखरपुडा याविषयी चाहत्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. मात्र चाहत्यांनी तिच्यावर आतांपासूनच शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे. ऋता गेल्या काही दिवसांपासून प्रतीकसोबतचे फोटो पोस्ट करत आहेत. कदाचित याच आठवड्यात हृता आणि प्रतीकचा साखरपुडा **(Hruta Durgule Engagement)**पार पडणार असल्याची चर्चा रंगलेली आहे. ऋताकडून याविषयी मात्र कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांना देखील याविषयी उत्सुकता लागली आहे. वाचा- ‘83’च्या निर्मात्यांना बसणार मोठा दणका! रिलीज होताच LEAK झाला रणवीरचा चित्रपट ऋता दुर्गुळेनं काही दिवसांपूर्वीच रिलेशनशिपमध्ये असल्याची घोषणा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. दिग्दर्शक प्रतीक शाहला ती डेट करत आहे .प्रतीक आणि ऋता सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. प्रतीक हा हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. त्याने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘तेरी मेरी इक जिंदडी’, ‘बेहद २’, ‘बहु बेगम’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’, ‘एक दिवाना था’ यांसारख्या मालिकांचं दिग्दर्शन प्रतीकने केलं आहे.
मास मीडिया या पदवी अभ्यासक्रमातील जाहिरात क्षेत्रात शिक्षण घेतलेली अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिच्या ‘दुर्वा’ या मालिकेतून सर्वांसमोर आली. या मालिकेनं जवळपास हजार भागांचा टप्पा पूर्ण केला होता.
त्यानंतर ती ‘फुलपाखरू’ मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती. तिची क्रेज पाहता मराठी अभिनेत्रींमध्ये सोशल मीडियावर सर्वात जास्त लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. सध्या ती मन उडू उडू झालं या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.