JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / काय म्हणात ह्रता दुर्गुळेचे केस पांढरे झालेत? अभिनेत्रीचा नवीन हेअरकट पाहून चाहत्याची भन्नाट कमेंट

काय म्हणात ह्रता दुर्गुळेचे केस पांढरे झालेत? अभिनेत्रीचा नवीन हेअरकट पाहून चाहत्याची भन्नाट कमेंट

नुकताच ह्रता दुर्गुळेनं नवीन हेअरकट केला आहे. ह्रतानं नवीन हेअरकटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांनी त्याच्यावर कमेंटचा पाऊस सुरू केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 मार्च- अभिनेत्री ह्रता दुर्गुळे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्रता चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. नुकताच ह्रतानं नवीन हेअरकट केला आहे. ह्रतानं नवीन हेअरकटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांनी त्याच्यावर कमेंटचा पाऊस सुरू केला आहे. ह्रताचा नवीन लूक चाहत्यांना देखील आवडला आहे. ह्रतानं इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिनं नवीन हेअरकट केल्याचे दिसत आहेत. ती नवीन हेअरकटमध्ये नेहमीप्रमाणे सुंदर दिसत आहेत. चाहत्यांना देखील तिचा नवीन लूक भलताच आवडलेला दिसत आहे. तिच्या लूकवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस केला आहे. एका चाहत्याने म्हटलं आहे की, मला आवडला हेअरकट तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, तू या नवीन हेअरकटमध्ये सुंदर दिसत आहेस. अशा अनेक कमेंट आल्या आहेत ज्यामध्ये ह्रताच्या सुंदरतचे चाहत्यांने कौतुक केलं आहे. मात्र या सगळ्यात एका चाहत्याची कमेंट मात्र सर्वांचे लक्षवेधून घेत आहे. या चाहत्याने म्हटलं आहे की, केस तुझे पांढरे झालेत आग बघ जरा. वाचा- मनोज वाजपेयी शाहरूखसोबत पहिल्यांदाच डिस्कोमध्ये गेला, मग झालं असं काही.. झी टॉकीज वाहिनीतर्फे दरवर्षी जाहीर होणाऱ्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कार सोहळ्यात कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले होते.या पुरस्कार सोहळ्यातील सर्वात लोकप्रिय चेहरा हा पुरस्कार अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने पटकावला आहे. चाहत्यांकडून तिचं कौतुक होत आहे. पुरस्कार मिळाल्याचा आनंद ह्रतानं सोशल मीडिया पोस्ट करत नुकताच चाहत्यांसोबत शेअर केला होता.

संबंधित बातम्या

हृता दुर्गुळेच्या कामाबद्दल सांगायचं तर तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. हृताने दुर्वा या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ती फुलपाखरु या मालिकेत झळकली. या मालिकेमुळेच तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. हृताने अनन्या आणि टाइमपास 3 या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. मोठ्या पडद्यावर देखील ह्रताच्या अभिनयाचे कौतुक झालं.

हृताने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी पुढचं पाऊल या लोकप्रिय मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केली होती. हृता ही मूळची कोकणातली मात्र ती लहानाची मोठी झाली ती मुंबईत झाली. रामणारायन रुईया कॉलेजमधून शिक्षण घेत असताना तिला अभिनय क्षेत्राची ओढ लागली. हृता दुर्गुळे हिने ‘फुलपाखरू’ या मालिकेत वैदेही हे पात्र साकारलं. या पात्राने तिला महाराष्ट्रातल्या घरा-घरात पोहोचवलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या