JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'अन् या क्षणाला मी भावुक...', ऐतिहासिक भूमिका साकारल्यानंतर अपूर्वा नेमळेकरची पोस्ट चर्चेत

'अन् या क्षणाला मी भावुक...', ऐतिहासिक भूमिका साकारल्यानंतर अपूर्वा नेमळेकरची पोस्ट चर्चेत

रात्रीस खेळ चाले मालिकेनंतर अपूर्वा ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत दिसली. या मालिकेत तिनं माझी राणी चेंनम्मा यांची भूमिका साकारली. अपूर्वाची ही पहिलीच ऐतिहासिक भूमिका होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 फेब्रुवारी-  शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर **( apurva nemlekar )**सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या हटके फोटोशुटमुळे नेहमी ती चाहत्यांची लक्षवेधून घेत असते. रात्रीस खेळ चाले मालिकेनंतर अपूर्वा  ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत दिसली. या मालिकेत तिनं माझी राणी चेंनम्मा यांची भूमिका साकारली.  अपूर्वाची ही पहिलीच ऐतिहासिक भूमिका होती. या भूमिकेला प्रेक्षकांकडून प्रेम मिळालं. आज शिवजयंतीचं निमित्त साधत अपूर्वाने एक पोस्ट लिहिली आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडिवार चर्चेत आहे. अपूर्वाने इन्स्टावर एक फोटो पोस्ट करत म्हटलं आहे की, नुकतेच आपण पाहिलेली, ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेतली माझी राणी चेंनम्मा ची भूमिका, ही माझी पहिली ऐतिहासिक भूमिका झाली.माझ्या आधीच्या साकारलेल्या भूमिकांवर आतापर्यंत मला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होताच, परंतु, ह्या ऐतिहासिक भूमिकेत, ज्या क्रिएटिव् टीम ने माझा विचार केली त्यांचे सर्व प्रथम आभार मानते. @rajrajshekhar8 .ही भूमिका करत असताना माझ्या दिग्दर्शकांनी मला खूप छान पद्धतीने सांभाळून घेतले, तेव्हा त्यांचे सुद्धा मनःपूर्वकआभार @kartik_kendhe सर @risingstarr_10 सर @shirishk85 सर. माझ्या सहकलाकारांनी मला खूप पाठिंबा दिला.

संबंधित बातम्या

आज ह्या मालिकेतील, माझा खारीचा वाटा निरोप घेतोय, पणं यातून बरच काही शिकायला मिळालं. जगदंब क्रिएशन्स ने माझा सत्कार करून आज मला आयुष्यभरासाठी राणी चेनम्माची आठवण म्हणून ही प्रतिमा भेट देऊन सन्मानित केले. ह्या क्षणाला मी खूप भावुक झाली आहे, म्हणूनच मी माझ्या प्रेक्षकांना माझे मनोगत व्यक्त करावसं वाटले, सोनी मराठी आणि जगदंबा क्रिएशन चे मनःपूर्वक आभार 🙏💐माझे प्रोडूसर ह्यांचे खूप खूप धन्यवाद ज्यांनी मला हि संधी दिली, @amolrkolhe ,Ghanashyam Rao आणि Vilas Sawant.तसेच माझ्या टीम चे मनःपूर्वक धन्यवाद 🙏श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शुभदिनीसर्व शिवभक्तांना माझा मानाचा मुजरा. वाचा- ‘महाराजांबद्दलचे प्रेम, कौतुक, आदर, श्रद्धा…’, सोनाली कुलकर्णीची पोस्ट चर्चेत अशाप्रकारे अपूर्वाने तिच्या नव्या भूमिकेबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. चाहत्यांनी देखील आपली भूमिका कायस्वरूपी लक्षात राहील..अशा कमेंट करत तिच्या अभिनयाची पोचपावती दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या