JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / '...छोट्याशा वाटेला आलेलं मोठं सुख'; श्रेया बुगडेला मिळाला 'आचार्य अत्रे पुरस्कार'

'...छोट्याशा वाटेला आलेलं मोठं सुख'; श्रेया बुगडेला मिळाला 'आचार्य अत्रे पुरस्कार'

अभिनेत्री श्रेया बुगडेला मिळाला मानाचा आचार्य अत्रे पुरस्कार.

0107

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री तसेच विनोदवीर श्रेया बुगडे (Shreya Bugade) नेहमीच प्रेक्षकांच भरभरून मनोरंजन करताना दिसते. श्रेयाला नुकताच 'आचार्च अत्रे पुरस्कार' प्राप्त झाला आहे.

जाहिरात
0207

आज प्रसिद्ध लेखक , साहित्यिक आचार्य अत्रे यांचा स्मृतीदिन यानिमित्त या पुरस्कारांच वितरण करण्यात आलं. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली. यासोबतच तिने काही ओळीही लिहील्या आहेत.

जाहिरात
0307

ती लिहिते, 'ते पगावकरांनी म्हटलंय ना .... 'सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ? ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं.. भर पहाटे धुक्याची रेषा डोळ्याला दिसणं, सोनचाफ्याची फुले वेचताना हातांचं सुगंधी होणं, नंदादिपातल्या ज्योतीकडे एक क्षण बघणं, सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ? ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं..'

जाहिरात
0407

पुढे तिने लिहिलं आहे, '....माझ्या छोट्याश्या वाटेला आलेलं खूप मोठ्ठ सुख !!!!❤️आचार्य अत्रे कलाकार पुरस्कार २०२१ 🙏😇'

जाहिरात
0507

'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कॉमेडी शोमधून श्रेया प्रेक्षकांचं मनोरंजन करते. तिच्या अभिनयाचे आणि विनोदी बुद्धीचे अनेक चाहते आहेत.

जाहिरात
0607

गेली अनेक वर्षे हा कार्यक्रम सातत्याने सुरू आहे. श्रेयाने तिच्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे.

जाहिरात
0707

श्रेयाला हा पुरस्कार मिळाल्यानंतर तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या