मुंबई, 13 नोव्हेंबर : मराठमोळ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर **(aishwarya narkar)**पुन्हा एकदा ऐतिहासिक मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आता मराठीनंतर त्या हिंदी मालिकेत दिसणार आहेत. ‘काशीबाई बाजीराव बल्लाळ’ ( kashibai bajirao ballal) असं या मालिकेचं नाव असून त्यात त्या राधाबाईंच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘काशीबाई बाजीराव बल्लाळ’ या हिंदी मालिकेचे प्रोमोज् सध्या टीव्हीवर मोठ्या प्रमाणावर झळकतायत. या ऐतिहासिक मालिकेची प्रेक्षकांना खुपच उत्सुकता लागून राहिली आहे. याच मालिकेत ऐश्वर्या नारकर राधाबाईंची भूमिका साकारणार आहे. वाचा : Aryan khan च्या सुरक्षिततेसाठी Shahrukh Khan चा मोठा निर्णय; ‘या’ व्यक्तीकडे… ऐश्वर्या नारकर यांनी यापूर्वी ‘स्वामिनी’ या मराठी मालिकेत पेशवे घराण्यातील गोपिकाबाई यांची व्यक्तिरेखा साकारली होती. आता पुन्हा एखादा त्या पेशवे घराण्यातील महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेत पाहायला मिळणार आहेत. त्यांना या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
ऐश्वर्या यांनी या मालिकेबद्दल सांगितलं की, ‘बऱ्याच काळानंतर हिंदी मालिकेत काम करण्याचा योग जुळून आला आहे. मालिकेत राधाबाईंसारख्या महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका साकारण्यास मी उत्सुक आहेशक्तिशाली आणि धाडसी वर्तणूक हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे. राधाबाईंभोवती असलेलं वलय आणि त्यांच्या कणखर नेतृत्त्वाच्या मी प्रेमात पडले आहे. मला अशाच व्यक्तिरेखा आवडतात. या महत्त्वपूर्ण मालिकेसाठी आम्ही खूप मेहनत घेतली असून प्रेक्षकांना ही मालिका पाहायला निश्चितच आवडेल, याची मला खात्री आहे.’ वाचा : मराठमोळा अमेय वाघ दिसणार करण जोहरच्या ‘या’ सिनेमात कलाकार मंडळी नेहमीच आपल्या फॅन्ससोबत कनेक्टेड राहण्यासाठी सोशल मीडियावर काही ना काही नवं पोस्ट करताना दिसतात. आपल्या डेली लाईफमधील प्रत्येक अपडेट्स ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यात कलाकारांच्या एकापेक्षा एक स्टाईलिंग आणि फोटोशूटची देखील सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते.यात एव्हरग्रीन अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा देखील समावेश आहे. ऐश्वर्या नारकर या इंस्टाग्रामवर आपले नवनवीन लुकमधील फोटो पोस्ट करत असतात. या फोटोंना चाहत्यांची चांगलीच पसंती मिळताना दिसते.