(Ashadhi Ekadashi) आषाढी एकादशीच्या निमित्ताने निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांच्यापासून ते अगदी (Ajinkya Raut) अजिंक्य राऊत, (Shivani Sonar) शिवानी सोनार अशा मराठी कळकरांनी खास फोटो शेअर केले आहेत.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज मराठी सिनेसृष्टी विठुरायाच्या गजराने दुमदुमून गेल्याचं दिसून आलं आहे. मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांचे आषाढी एकादशी स्पेशल काही फोटो पाहूया.
अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी खास फोटो शेअर करून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला’ अशी कॅप्शन त्यांनी लिहिली आहे. त्यांच्या मालिकेच्या सेटवर सुद्धा आषाढी एकादशी निमित्त काही फोटो काढण्यात आले होते.
बिग बॉस मराठी फेम अभिनेता विकास पाटीलने सुद्धा विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीसोबत सुंदर फोटोस शेअर केला आहे.
‘राजा रानीची गं जोडी’ मधील संजू म्हणेजच अभिनेत्री शिवानी सोनार हिने डोक्यावर विठ्ठलाची मूर्ती घेऊन फोटो शेअर केला आहे.
अजिंक्य राऊत या अभिनेत्याने ‘विठूमाऊली’ मालिकेत विठ्ठलाची भूमिका साकारली होती. त्याच्या मालिकेतील एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर करत त्याने सगळ्यांना शुभेच्छा दिल्या.
संदीप पाठकच्या खास पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. केवळ सावली दिसणारा ब्लॅक अँड व्हाईट फोटो त्याने शेअर केला आहे. त्या सावलीत विठ्ठलाचा भास होत आहे. या सुंदर फोटोचं कौतुक होत आहे.
अभिनेत्री अश्विनी महांगडेने सुद्धा सूचक फोटो शेअर केला आहे. तिच्या या खास फोटोला फारच पसंती मिळत आहे.
अभिनेत्री रश्मी अनपटने सुद्धा आषाढी एकादशी निमित्ताने खास फोटोशूट केलं आहे. त्यातील अनेक फोटो पसंत केले जात आहेत.