JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Video: हेमंत ढोमेनं अशोक मामांच 'ते' सुपरहिट गाणं केलं रिक्रिएट, रेट्रो लूकनं वेधलं लक्ष

Video: हेमंत ढोमेनं अशोक मामांच 'ते' सुपरहिट गाणं केलं रिक्रिएट, रेट्रो लूकनं वेधलं लक्ष

हेमंत ढोमे ‘फकाट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच चित्रपटाचे एक दमदार गाणे नुकतेच भेटीला आले आहे. अशोक सराफ यांचे गाजलेले गाणे ‘तुझी माझी जोडी जमली’ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे.

जाहिरात

हेमंत ढोमेनं अशोक मामांच 'ते' सुपरहिट गाणं केलं रिक्रिएट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 एप्रिल- मराठमोळा अभिनेता हेमंत ढोमे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असतो. याशिवाय त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दलती माहिती देखील तो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतो. हेमंत ढोमेनं नुकतीच एक आनंदाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. यानिमित्त सर्वांना हेमंतला नवीन अंदाज तर पाहायला मिळणारच आहे, शिवाय अभिनय सम्राट अशोक सराफ यांचं गाजलेले गाणे ‘तुझी माझी जोडी जमली’ देखील अनुभवता येणार आहे. हेमंत ढोमे ‘फकाट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच चित्रपटाचे एक दमदार गाणे नुकतेच भेटीला आले आहे. अशोक सराफ यांचे गाजलेले गाणे ‘तुझी माझी जोडी जमली’ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे.विशेष म्हणजे या गाण्यावर हेमंत ढोमे आणि अभिनेत्री अनुजा साठे यांनी भन्नाट डान्स केला आहे. हे गाणे पाहून आपण पुन्हा जुन्या आठवणीत रमतो. कारण जुन्या गाण्याप्रमाणेच हे गाणे देखील बागेत आणि त्याच वेशभूषेत आणि तितक्याच जोषात चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- कायद्याच्या कचाट्यात अडकला हनी सिंग; रॅपरवर किडनॅपिंग-मारहाणीचे गंभीर आरोप हेमंत ढोमेनं याबद्दल पोस्ट करत म्हटलं आहे की, ज्यांचं काम बघत आपण वाढलो, त्या महाराष्ट्राच्या विनोद सम्राटाने अजरामर केलेलं गाणं मला पुन्हा नव्या रूपात नव्या ढंगात सादर करायला मिळतंय हे माझं भाग्य!तुमच्या सारखं काम तर करता येणार नाही कधीच, पण तुमच्या कामाला सलाम करण्याचा आमचा हा प्रयत्न… 🙏🏽अशोकमामा काही चुकलं असेल तर नेहमीसारखं मोठ्या मनाने सांभाळून घ्या!तुमचा शिष्य,ढोम्या!#samratashok #ashoksaraf #salute #tribute #phakaat #tuzimazijodi,,या गाण्याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे.

श्रेयश जाधव दिग्दर्शित ‘फकाट’ चित्रपटातील ‘तुझी माझी जोडी’ हे गाणं हर्षवर्धन वावरे आणि कस्तुरी वावरे यांनी गायले आहे. शांताराम नांदगावकर आणि हर्ष, करण, आदित्य या ‘ट्रिनिटी ब्रदर्स’ यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. तर या गाण्याला ‘ट्रिनिटी ब्रदर्स’चेच संगीत लाभले आहे.

हे गाणं रिक्रिएट करण्यात आले आहे. या गाण्यातील रेट्रो लूक सर्वांचे लक्ष वेधून घेतो. विशेष म्हणजे आता अनेक गाणी रिक्रिएट केली जातात. प्रेक्षकांचा देखील याला चांगाला प्रतिसाद मिळताना दिसतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या