JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अभिनेता अंकुश चौधरीला कोरोनाची लागण ; ट्विट करत दिली माहिती

अभिनेता अंकुश चौधरीला कोरोनाची लागण ; ट्विट करत दिली माहिती

अभिनेता अंकुश चौधरी (ankush chaudhary corona positive) याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडिया पोस्ट करत त्यांने याची माहिती दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 जानेवारी- कोरोनाचा प्रसार सध्या देशात वाढत आहे. बॉलिवूडमध्ये तर कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अनेक बॉलिवूड सेलेब्सना कोरोनाची लागण झाली आहे. आता मराठीतील लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरी (ankush chaudhary corona positive)   याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. अंकुशनं सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. अभिनेता अंकुश चौधरीने ट्विटरवर ट्विट करून आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. अंकुशने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे कि, नमस्कार, माझी कोरोना चाचणी पॅाझिटीव्ह आली आहे. डॅाक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत आणि तुमचे आशिर्वाद आहेच. कोरोना वर मात करून पुन्हा त्याच जोशात आणि त्याच जोमात पुन्हा तुमच्यासमोर येईन. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास चाचणी करून घ्यावी.

संबंधित बातम्या

अंकुशने नुकतेच मराठी डान्सिंग रिऍलिटी शोचे परीक्षक म्हणून काम पाहिले आहे . यानंतर आता लवकरच त्याचा लकडाऊन हा चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अंकुश चौधरीसोबत अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील दिसणार आहे.‘लकडाऊन’ चित्रपटाची कथा त्याच्या नावातच दडलेली आहे. लॉकडाउनदरम्यान ठरलेलं एक लग्न करण्यासाठी कोणकोणत्या अडचणी येतात, याचं विनोदी चित्रण या चित्रपटात केलं गेलं आहे. ‘लकडाऊन’ या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची मेजवानी प्रेक्षकांना अनुभवाला मिळणार आहे. चित्रपटाचं चित्रीकरण पूर्णतः शिवजन्मभूमी जुन्नर (किल्ले शिवनेरी) येथे झालं आहे. वाचा- BBM3: जय दुधाणे-उत्कर्ष शिंदेनं मीराला दिलं सरप्राईज! घेतली कुटुंबाची भेट दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर अभिनेता अंकुश चौधरी मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. ट्रिपल सीट, क्लासमेट अशा अनेक चित्रपटांत अंकुशने काम केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या