JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'या' चिमुकलीच कौतुक करावं तेवढं थोडंच ! अमोल कोल्हेंनी पोस्ट केलेला व्हिडिओ पाहून तुम्ही देखील म्हणाल, जय शिवराय..

'या' चिमुकलीच कौतुक करावं तेवढं थोडंच ! अमोल कोल्हेंनी पोस्ट केलेला व्हिडिओ पाहून तुम्ही देखील म्हणाल, जय शिवराय..

स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेने डॉ. अमोल कोल्हे यांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. त्यामुळे गेल्या काही काळात ग्रामीण भागात अमोल कोल्हे यांचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे.

जाहिरात

amol kolhe

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 मार्च- अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. अमोल कोल्हे त्यांच्या कामाच्या विविध अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते नेहमीच चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असतात. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेने डॉ. अमोल कोल्हे यांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. त्यामुळे गेल्या काही काळात ग्रामीण भागात अमोल कोल्हे यांचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. अनेक ऐतिहासिक भूमिका साकारल्यामुळे नागरिक त्यांच्याकडे कायम आदराने पाहतात. वाचा- सिनेमात काम देतो सांगून दिग्दर्शकाचे अभिनेत्रीवर अत्याचार; बार्शीत खळबळ अमोल कोल्हे यांनी शिवाजी महाराज यांचा एक सुंदर व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी शिवाजी महाराज यांचे दोऱ्याच्या साहाय्यने चित्र तयार करत आहेत. तिचा हा व्हि़डिओ खरचं कौतुकास्पद आहे. अमोल कोल्हे हा व्हिडिओ पोस्ट करत म्हणतात की, काय एकेकाच्या हातात कला असते ! कौतुक करावं तेवढं थोडंच !!!

संबंधित बातम्या

या मुलीच नाव श्रेया चंदरकर असं आहे. तिच्या हातातील कला पाहून नेटकरी देखील भारावून गेले आहेत. या मुलीचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी देखील यावर कमेंटचा वर्षाव केला आहे. एकानं म्हटलं आहे की, खरंच अजूनही आपल्या महाराष्ट्राच्या मातीत, आपल्या मराठी मुलांमध्ये ही अद्भुत कला जोपासली आहे याचा सार्थ अभिमान आहे. … श्रेया ताई खूप खूप शुभेच्छा!!! तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की,विश्वसनिय आणि अद्भुत आहे ही कला या छुटकिची……मन प्रसन्न झालं आणि भरूनही आलं तिच्या हातांच्या या जादुगारिवर…….सुरेख आणि देखणं रूप आपल्या शिवबाचं…….. अशा असंख्य कमेंट या मुलीचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केला आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. अमोल कोल्हे यांनी मोदी लाटेतही लोकसभेची निवडणूक जिंकली. 2019 मध्ये महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ 4 खासदार निवडून आले. यामध्ये अमोल कोल्हे यांचा समावेश आहे. आता देखील ते जेव्हा एखाद्या मुद्द्यावर बोलतात तेव्हा ग्रामीण भागात त्याची बऱ्यापैकी चर्चा रंगते. मागील वर्षी त्यांनी सोशल मीडियावरून काही काळासाठी ब्रेक घेतला होता.तेव्हा देखील त्यांची चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा ते सोशल मीडियावर जोमाने सक्रीय झाले आहे. कलाकार म्हणून ते लोकांच्यात लोकप्रिय आहेतच पण आता त्यांची राजकारणात देखील लोकप्रियता वाढत आहे.  अदगी सहजपणे ते लोकांच्या मिक्स होतात व त्यांचे प्रश्न समजावून घेताना दिसतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या