JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'झांसी की राणी'मधील 'मनू' नावानं मिळाली ओळख, आता काय करते Ulka Gupta?, पाहा PHOTOS

'झांसी की राणी'मधील 'मनू' नावानं मिळाली ओळख, आता काय करते Ulka Gupta?, पाहा PHOTOS

Ulka Gupta : तुम्हाला झी टीव्हीचा प्रसिद्ध शो ‘झांसी की रानी’ आठवत असेल ज्यामध्ये उल्का गुप्ताने राणी लक्ष्मीबाईची बालपणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिचं फार कौतुक झालं होतं आणि इंडियन टेली अवॉर्ड्समध्ये तिला सर्वात लोकप्रिय बाल अभिनेत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. मनूची भूमिका साकारणारी उल्का गुप्ता आता पूर्णपणे बदलली आहे.

0105

उल्का गुप्ता ज्या प्रकारे झाशीची राणी म्हणून समोर आली, त्यावरून तिच्या अभिनयाची पातळी लक्षात येते. तिनं साकारलेल्या मनूच्या भूमिकेमुळे ती घराघरात पोहचली होती.

जाहिरात
0205

उल्का बिहारमधील सहरसा येथील असून टीव्हीच्या दुनियेत आल्यानंतर आता ती साउथ फिल्म इंडस्ट्रीत नशीब आजमावत आहे. तिने 2015 मध्ये 'Andhra Pori' मधून तेलुगुमध्ये पदार्पण केलं होतं.

जाहिरात
0305

2016 मध्ये उल्का 'Rudhramadevi' मध्ये बालकलाकार म्हणून दिसली होती. या चित्रपटात अनुष्का शेट्टीच्या भूमिकेत दिसली होती आणि यामध्ये ती घोडेस्वारी करताना दिसली होती. या चित्रपटातून तिनं पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली.

जाहिरात
0405

उल्काने 2017 मध्ये 'Traffic' आणि 'Mr. Kabaadi' मध्येही काम केलेलं आहे. त्यानंतर 2018 मध्ये रणवीर सिंग स्टारर सिम्बा या चित्रपटातही तिनं भूमिका केली होती. तो तिचा शेवटचा चित्रपट आहे.

जाहिरात
0505

24 वर्षीय या तरुणीला तिच्या डार्क स्किन टोनमुळे सुरुवातीला अनेक नकारांचा सामना करावा लागला होता, परंतु ती आता ती आपले पाय सिनेमांमध्ये घट्ट रोवत आहे. आजकाल ती डान्स क्लासेस देखील घेत आहे, ज्याचे व्हिडिओ ती सतत शेअर करत असते. यासोबतच उल्का तिच्या ग्लॅमरस फोटोंद्वारे लोकांचं लक्ष वेधून घेत असते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या