JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मन झालं बाजिंद' फेम श्वेताने घेतली 11 लाखांची 'ही' कार, म्हणाली...

मन झालं बाजिंद' फेम श्वेताने घेतली 11 लाखांची 'ही' कार, म्हणाली...

‘मन झालं बाजिंद’ (Man Jhala Bajind) फेम श्वेता राजन हिने नुकतीच एक छान बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यावेळी ती खूप आनंदात दिसली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 फेब्रुवारी- झी मराठी वाहिनीवरील ‘मन झालं बाजिंद’ (Man Jhala Bajind) ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेतील राया आणि कृष्णाची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. व्हॅलेंटाईन डेला रायाने कृष्णाला एकद हटके स्टाईल प्रपोज केले. मालिकेत कृष्णाची भूमिका श्वेता राजन (Shweta Rajan) साकारताना दिसत आहे.श्वेता सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नुकतीच तिनं एक छान बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यावेळी ती खूप आनंदात दिसली. श्वेता राजन हिने नुकतीच एक कार खरेदी केली आहे. इन्स्टा पोस्ट करत तिनं याबद्दल माहिती दिली आहे. श्वेताने इन्स्टावर एक गाडीचा व्हिडिओ शेअर केला आहे. ‘माय न्यू बेबी इन द हाऊस’ असं कॅप्शन तिनं हा व्हिडीओ शेअर करताना दिला आहे. श्वेतावर चाहत्यांसोबतच सर्व सेलिब्रेटीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. श्वेताने फोक्सवॅगन टाईगन (wolkswagen Taigun) SUV कार खरेदी केली आहे. यावेळी ती खूपच आनंदात दिसली. या कारची किंमत 11 लाखाच्या घरात आहे. वाचा- आई कुठे काय करते फेम अनघा ‘या’ व्यक्तीच्या प्रेमात? पोस्टमुळे रंगली चर्चा ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेत काम करण्यापूर्वी श्वेताने ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेत संजीवनीच्या बेस्ट फ्रेण्डची अर्थात मोनाची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिचं चांगलंच कौतुक झालं आहे. श्वेता सोशल मीडियावक नेहमी आपले डान्स व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. यासोबतच तिनं ‘घेतला वसा टाकू नको’ मालिकेतील भगवान शंकराच्या पौराणिक कथेत महालक्ष्मीची भूमिका केली होती.

संबंधित बातम्या

यंदाच्या वर्षात अनेक मराठी कलाकारांनी नवीन कारची खऱेदी केली आहे. अमेय वाघने देखील काही दिवसापूर्वी कार घेतली होती. त्याने देखील सोशल मीडिया पोस्ट करत याबद्दल माहिती दिली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या