JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मल्लिका शेरावतनं शेअर केला Topless Photo, हॉट लुकवर चाहते फिदा

मल्लिका शेरावतनं शेअर केला Topless Photo, हॉट लुकवर चाहते फिदा

बॉलिवूड पासून दूर राहूनही मल्लिकानं तिचा स्टारडम उत्तम प्रकारे सांभाळला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. मात्र तरीही सोशल मीडियावर मात्र तिच्याच चर्चा होताना दिसतात. किंबहुना चर्चेत कसं राहायचं हे तिचा चांगलंच माहित आहे. बॉलिवूड पासून दूर राहूनही मल्लिकानं तिचा स्टारडम उत्तम प्रकारे सांभाळला आहे. मल्लिका सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे आणि ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अशाच एका फोटोमुळे सध्या सगळीकडे तिची जोरदार चर्चा सुरू आहे. मल्लिका शेरावतनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक टॉपलेस फोटो शेअर केला आहे. हा फोटो ब्लॅक अँड व्हाइट असून त्यात मल्लिका तिच्या जुन्या स्टाईल आणि अंदाजात पोझ देताना दिसत आहे. सोशल मीडियावर मल्लिकाचे 1 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिनं ‘मर्डर’, ‘ख्वाहिश’, ‘वेलकम’ आणि ‘हिस्स’ सारख्या सिनेमांमध्ये अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. त्यामुळे तिला बॉलिवूडची सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. इमरान हाश्मीसोबत मर्डर सिनेमात मल्लिकानं साकारलेली भूमिका कोणीच विसरलेलं नाही. या सिनेमात बॉलिवूडमधील आतापर्यंतचे सर्वाधिक बोल्ड सीन्स आहेत. त्यानंतर आता अनेक वर्षांनतर मल्लिका पुन्हा एकदा तिच्या जुन्या अवतारात दिसली. रजनीकांत-बियर ग्रिल्स यांच्या ‘इन टू द वाइल्ड’चा धमाकेदार टीझर रिलीज, पाहा VIDEO

सोशल मीडियावर मल्लिकाचा हा फोटो खूप व्हायरल होत आहे. तिच्या या लुकवर चाहते पुन्हा एकदा फिदा झालेले पाहायला मिळत असून फोटोवर कमेंटचा अक्षरशः पाऊस पडत आहे. काही दिवसांपूर्वी मल्लिकानं बिग बॉस 13 मध्ये हजेरी लावली होती. यावेळी ती सलमानसोबत बिग बॉसच्या सेटवर धम्माल करताना दिसली होती. एवढंच नाही तर जेव्हा तिनं बिग बॉसच्या घरात एंट्री केली त्यावेळी ती आसिम रियाजसोबत रोमँटिक डान्स करताना दिसली होती. डान्स करताना तिनं असिम रियाजचं शर्ट काढल्यानं ती खूप चर्चेत आली होती. सोनाक्षी सिन्हानं केला मोठा खुलासा, ‘या’ कलाकारांना लगावली चपराक

जाहिरात

मागच्या वर्षी बॉलिवूडमध्ये Me Too चळवळ सुरू असताना मल्लिकानं अनेक मोठे खुलासे सुद्धा केले होते. मल्लिकाला अनेक प्रोजेक्टमधून फक्त या कारणसाठी बाहेर काढण्यात आलं होतं कारण तिनं तिच्या सहकलाकारांसोबत संबंध ठेवण्यास नकार दिला होता. मल्लिका शेवटची 2019 मध्ये आलेल्या एकता कपूरच्या ‘बू सबकी फटेगी’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. तर 2017मध्ये तिचा शेवटचा सिनेमा जीनत रिलीज झाला होता. यानंतर तिनं कोणत्याही बॉलिवूड सिनेमात काम केलेलं नाही. अखेर अण्णा नाईकांनी शेवंता नाही तर माईंबरोबर केला रोमान्स, VIDEO एकदा पाहाच

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या