JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / विकेंडला पुन्हा एकदा दिसला मलाइका अरोराचा हॉट अवतार

विकेंडला पुन्हा एकदा दिसला मलाइका अरोराचा हॉट अवतार

काही दिवसांपूर्वी तिनं शेअर केलेल्या एका फोटोमधील आर्मपीट फ्लॉन्टिंगमुळे तिला ट्रोल व्हावं लागलं होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 जून : बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मलायका अरोरा काही दिवसांपासून अर्जुन कपूरशी असलेल्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आहे. पण याशिवाय ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. नेहमीच ती सोशल मीडियावर तिचे हॉट फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिनं शेअर केलेल्या एका फोटोमधील आर्मपीट फ्लॉन्टिंगमुळे तिला ट्रोल व्हावं लागलं होतं. त्यानंतर आता विकेंडला पुन्हा एकदा सोशल मीडियावर हॉट फोटो शेअर करत ती चर्चेच कारण बनली आहे. मलायकानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती स्वीमिंग पुलमध्ये एंजॉय करतना दिसत आहे. या फोटोला, वाढत्या उष्णतेनं मला पाण्यात खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. पण सोशल मीडियावरील हिट मात्र मलायकाच्या या फोटोनं वाढवली आहे. यासोबत मलायकानं TGIF असा हॅशटॅग वापरला आहे. ज्याचा अर्थ ‘थँक्स गॉड इट्स फ्रायडे’ असा आहे.

याशिवाय मलायका नेहमीच तिचे फिटनेस व्हिडिओसुद्धासोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तसेच वेगवेगळ्या सामाजिक विषयांवरही ती बोलताना दिसते. त्यामुळे अनेकदा तिचं कौतुक होतं मात्र काही वेळा तिला या सर्वांमुळे टीकाही सहन करावी लागते.

काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याची सगळीकडेच जोरदार चर्चा सुरु आहे. नुकतंच त्यांनी प्रसार माध्यमांसमोर आपल्या नात्याची जाहीर कबूली दिली होती. त्यामुळे आता हे दोघं लवकरच लग्नाच्या बेडीत अडकतील असा अंदाज लावला जात आहे. काही दिवसांपूर्वी मलायका अर्जुन 19 एप्रिलला लग्न करणार असल्याच्या चर्चा होत्या मात्र नंतर ल त्या सर्व अफवा असल्याचं सिद्ध झालं. तर काहींचं म्हणणं आहे की, अर्जुनची बहीण अंशुला कपूरचं लग्न झाल्यानंतरच तो मलायकाशी लग्न करणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या