JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अखेर अर्जुनसोबतच्या आपल्या नात्याबद्दल बोलली मलायका

अखेर अर्जुनसोबतच्या आपल्या नात्याबद्दल बोलली मलायका

अरबाजसोबतच्या घटस्फोटानंतर मलाईका अरोरा बऱ्याच वेळा अर्जुन कपूरसोबत फिरताना दिसत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 सप्टेंबर : अरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा बऱ्याच वेळा अर्जुन कपूरसोबत फिरताना दिसते. अरबाज आणि मलायका आपल्या मुलासाठी एकत्र पार्टी करताना दिसतात. मलायका आणि अर्जुनबद्दल असं बोललं जातंय की घटस्फोटानंतर मलायका अर्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या विषयावर इतके दिवस या दोघांनी गप्प राहणंच योग्य समजलं. पण आता मलायकाने यावर असं उत्तर दिलंय की तुम्ही ऐकून थक्क व्हाल. मलायका नुकतीच तिची मैत्रीण अनिता श्रॉफ अदजानियाच्या टॉक शोमध्ये गेली होती. त्यावेळी तिला अर्जुनसोबतच्या नात्याबद्दला विचारलं. तेव्हा ती बोलली, ‘मला डेटिंग वगैरे काही माहिती नाही. मला हे सगळं कळतदेखील नाही.’ जेव्हा मलायकाने अरबाजशी लग्न केलं होतं तेव्हा ती अनेक दिवस रिलेशनशिपमध्ये होती. आता मलायकाच्या अर्जुनसोबतच्या नात्याबद्दल असं उत्तर आल्यावर अनेक दुसरे प्रश्न उभे राहिलेत. जर खरंच मलायकाला डेटिंगबद्दल काय माहिती नसेल तर मग अरबाजसोबत लग्नाच्या आधी काय करत होती? त्याचबरोबर अर्जुनसोबत तिचं नेमकं नातं काय असा देखील प्रश्न निर्माण होतोय. आता याचं उत्तर तर अर्जुनच देऊ शकणार. बाॅलिवूडचा दबंग सलमान खानचा मोठा भाऊ अरबाज खान सट्टा प्रकरणात अडचणीत सापडलाय. त्याने सट्टा लावल्याची तशी कबुलीही दिली. अरबाजच्या या सट्टाबाजीमुळे मलायका अरोराने घटस्फोट घेतल्याचंही मान्य केलंय. अरबाज खान गेल्या सहा वर्षांपासून सट्टा लावत होता. आतापर्यंत कोट्यवधींचं नुकसान झालंय. पण गेल्या आयपीएल 11 व्या हंगामात २ कोटी ७५ लाख रुपये नुकसान झालं होतं असं त्यानं स्पष्ट केलंय. अरबाजने सहा वेळा सट्टा लावला असल्याचं सांगितलं. सट्टेबाजीमुळे मलायका आणि अरबाजमध्ये भांडणं होत होती. त्यामुळे मलायकाने अरबाजपासून दूर होण्याचा निर्णय घेतला होता. एवढंच नाहीतर त्याच्या सट्टेबाजीच्या सवयीमुळे त्यांचं कुटुंबही त्याच्यावर नाखूश होतं. PHOTOS : सई ताम्हणकरचा ‘लव्ह सोनिया’ चालला अमेरिकेला

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या