कधी परीची आई म्हणून टिपिकल लुकमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकणारी तर कधी ग्लॅमरस हॉट लुकमध्ये सर्वांचं लक्ष वेधणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे (prarthana behere favorite photo) नेहमीच हटके फोटोशूट करत असते. तिच्या प्रत्येक लुकची नेहमीच चर्च असते. प्रार्थनाचे अनेक फोटो दररोज व्हायरल होत असतात. मात्र या सगळ्यात प्रार्थनाचे आवडते फोटो कोणते असतील असा प्रश्न कधी पडलाय का? तर या प्रश्नाचं उत्तर देत प्रार्थनानं तिचे सगळ्यात आवडते फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्रार्थनानं स्वत: 'माय फेव्हरेट वन्स', असं कॅप्शन देत तिचे आवडते फोटो शेअर केले आहेत.
प्रार्थना हॉट लुक या फोटोमधून समोर आला आहे. टिपिकल नेहाच्या लुकमधून थेट ग्लॅमरस लुकनं प्रार्थनानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
'ब्यूटिफूल', 'गॉर्जियस', 'अमेझिंग' अशा कमेंट्स करत चाहत्यांनी प्रार्थनावर प्रेमाचा वर्षाव केलाय.
तसंच प्रार्थनानं तिच्या फोटोशूटचा BTS व्हिडीओ देखील शेअर केलाय. ज्यात तिच्या सुंदर फोटोंसाठी तिच्या टिमने घेतलेली मेहनत दिसून आली आहे.