R Madhavan
नवी दिल्ली, 20 डिसेंबर: एकेकाळी लाखो तरुणींना घायाळ करणारा अभिनेता आर. माधवन (R Madhavan )सध्या एका नव्या गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. सिनेसृष्टीत तो पत्नी, मुलासह दुबईत शिफ्ट होणार असल्याची चर्चा रंगली आहे. आर. माधवनचा मुलगा सध्या ऑलिम्पिक पदक जिंकण्याची तयारी करत आहे. माधवनचा मुलगा वेदांत राष्ट्रीय जलतरण चॅम्पियन आहे. राष्ट्रीय पदके जिंकल्यानंतर आता तो ऑलिम्पिकच्या दिशेने झेप घेत आहे. त्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर माधवनचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. यासाठीच माधवनने एक मोठे पाऊल उचलले आहे.
आर माधवनचा मुलगा वेदांत माधवन आगामी 2026 ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याची तयारी करत आहे. पण, भारतात मोठ्या तलावांची कमतरता आहे आणि जे तलाव आहेत, ते कोरोना महामारीमुळे बंद आहेत. त्यामुळेच वेदांतच्या सरावावर मोठा परिणाम होत आहे. भारतातील तलाव बंद असले तरी, दुबईमध्ये अनेक मोठे तलाव आहेत. त्यामुळेच आता वेदांताच्या सरावासाठी आर माधवन आणि त्याची पत्नी सरिता यांनी दुबईला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती माधवन बॉलीवुड हंगामाशी संवाद साधताना दिली आहे.
तसेच, त्याची आणि पत्नीची इच्छा आहे की, त्यांच्या मुलांने त्याच्या आवडीच्या क्षेत्रात भविष्य घडवावे. ते नेहमी त्याच्या पाठीशी उभे असतील. सध्या वेदांतचे लक्ष आगामी ऑलिम्पिककडे आहे. वेदांत केवळ आर माधवनचेच नव्हे तर भारताचे नावही रोशन करेल अशी अपेक्षा त्याने यावेळी व्यक्त केली. वेदांत माधवन उत्तम जलतरणपटू आहे. वेदांतला जलतरणात 7 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. अलीकडेच, वेदांतने 47 व्या ज्युनियर नॅशनल एक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये 7 पदके जिंकली. ही स्पर्धा बंगळुरू येथे पार पडली होती. वेदांतने या स्पर्धेत चार रौप्यपदके आणि तीन कांस्यपदके जिंकली.