JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Janhvi Kapoor च्या शरीरावरील त्या भागावर 'लव्ह बाईट'; Video मुळे गुपित उघड

Janhvi Kapoor च्या शरीरावरील त्या भागावर 'लव्ह बाईट'; Video मुळे गुपित उघड

बी-टाऊनची सिझलिंग अभिनेत्री जान्हवी कपूर कायमच तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत असते. अलीकडेच अभिनेत्रीच्या बहुप्रतिक्षित ‘मिली’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

जाहिरात

जान्हवी कपूर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 ऑक्टोबर : बी-टाऊनची सिझलिंग अभिनेत्री जान्हवी कपूर कायमच तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत असते. अलीकडेच  अभिनेत्रीच्या बहुप्रतिक्षित ‘मिली’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरमध्ये पहायला मिळतंय जान्हवीने कोल्ड स्टोअरमध्ये अडकलेल्या मिलीची भूमिका साकारली आहे. ट्रेलर समोर आल्यापासून चाहते जान्हवीच्या अभिनयाचे लोक खूप कौतुक करत आहेत. अशातच जान्हवी तिच्या नव्या फोटोशूटमुळेही चर्चेत आली आहे. तिचा नव्या फोटोशूटचा व्हिडीओ समोर आल्यापासून सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीच्या शरीरावर लव्ह बाईट पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. नुकतेच जान्हवीने इंस्टाग्रामवर एक धमाकेदार फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोंमध्ये जान्हवीने बॉडीकॉन ड्रेस घातलेला दिसत आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे. या फोटोंशिवाय जान्हवीने एक BTS व्हिडिओही शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही युजर्सना अभिनेत्रीच्या शरीरावर लव्ह बाइट दिसला आहे. याविषयी ते कमेंट करत असल्याचं दिसत आहे. हेही वाचा -  Anushka sharma: ‘बॉयकट आणि शाळेचा गणवेश’ घातलेल्या अनुष्का शर्माचे हे फोटो होतायत तुफान व्हायरल खरंतर हा लव्ह बाईट जान्हवीच्या हातावर आहे. तिच्या उजव्या हाताजवळ लव्ह बाईटची खूण लोकांना दिसली. यावर लोक तिला कमेंट करत प्रश्न विचारू लागलेत. अभिनेत्रीला लव्हबाइटबद्दल विचारले असता एका यूजरने लिहिले की, ‘हे लव्हबाईट आहे का?’. अशा अनेक प्रकारच्या कमेंट व्हिडीओवर येत आहेत. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरत आहे.

संबंधित बातम्या

दरम्यान, जान्हवी कपूर आणि तिचा ‘धडक’ चित्रपटाचा सहअभिनेता ईशान खट्टर यांची डेटिंगची अफवा पसरली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता दोघांचे ब्रेकअप झाले आहे. यानंतर जान्हवीच्या अक्षत राजनसोबतच्या रिलेशनशिपच्या बातम्या आल्या होत्या.जान्हवी सध्या ओरहान अवत्रामणीला डेट करत आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केले आहे.

जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती लवकरच तिच्या आगामी थ्रिलर चित्रपट ‘मिली’ मध्ये दिसणार आहे, ज्याचे दिग्दर्शन मथुकुट्टी झेवियर यांनी केले आहे. या चित्रपटात जान्हवीशिवाय सनी कौशल आणि मनोज पाहवा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या