वरुण धवनची बॉलिवूडमध्ये 10 वर्षे पूर्ण

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने बुधवारी चित्रपटसृष्टीत 10 वर्षे पूर्ण केली. 

वरुणने 2012 मध्ये आलेल्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.

पहिल्याच चित्रपटाने वरुणला चांगली लोकप्रियता मिळवून दिली. 

अभिनेता म्हणाला की तो त्याच्या कारकिर्दीच्या या टप्प्याचा आनंद घेत आहे आणि त्याच्या आगामी हॉरर कॉमेडी "भेडिया" च्या रिलीजची वाट पाहत आहे.

 'मी प्रत्येक चित्रपटात उत्तम काम केले आहे असे नाही. मी नेहमी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो', असं वरुण मुलाखतीदरम्यान म्हणाला. 

'एक काळ असा होता की मी अहंकारी विचार करायचो. मग मी हळू हळू विनम्र झालो', असंही वरुण म्हणाला.

आता तो बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

वरुणचा चाहतावर्गही बराच मोठा आहे.

बॉलिवूडमधे 10 पूर्ण केल्याबद्दल चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत.