JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: एका महिन्यात कमी करा 5Kg वजन; जॉन अब्राहमनं कपिल शर्माला दिल्या वेट लॉस टिप्स

VIDEO: एका महिन्यात कमी करा 5Kg वजन; जॉन अब्राहमनं कपिल शर्माला दिल्या वेट लॉस टिप्स

जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमार (Divya Khosla Kumar) ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचले होते. चॅनलने या एपिसोडचा प्रोमो रिलीज केला आहे. प्रोमो पाहता, या एपिसोडमध्ये कपिल शर्मा जॉन आणि दिव्यासोबत खूप धमाल करणार असल्याचे दिसून येत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 नोव्हेंबर-   बॉलिवूड   (Bollywood)   अभिनेता जॉन अब्राहमचा  (John Abraham)   चित्रपट ‘सत्यमेव जयते 2’  (Satyameva Jayate 2) आज (25 नोव्हेंबर) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. शेवटच्या क्षणीही ‘सत्यमेव जयते 2’च्या प्रमोशनमध्ये चित्रपट निर्माते कोणतीही कसर सोडू इच्छित नाहीत. याच क्रमात जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमार  (Divya Khosla Kumar)  ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचले होते. चॅनलने या एपिसोडचा प्रोमो रिलीज केला आहे. प्रोमो पाहता, या एपिसोडमध्ये कपिल शर्मा जॉन आणि दिव्यासोबत खूप धमाल करणार असल्याचे दिसून येत आहे.

संबंधित बातम्या

जॉन अब्राहमने दिल्या वेट लॉस टिप्स- जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमार त्यांच्या चित्रपट ‘सत्यमेव जयते 2’ च्या गाण्यावर ‘द कपिल शर्मा शो’मध्ये प्रवेश करताना प्रोमोमध्ये दिसत आहे. यानंतर जॉन पुशअप्स करताना दिसत आहे. दरम्यान, कपिल शर्मा जॉन अब्राहमला विचारतो की, जर एखाद्या माणसाला एका महिन्यात 5 किलो वजन कमी करायचे असेल तर त्याने काय करावे? तेव्हा जॉन हसत कपिलला म्हणतो, ‘तुला वजन कमी करायचे आहे का?‘यानंतर जॉन म्हणतो, ‘मी तुला संपूर्ण डाएट लिहून देईन, जर तुम्ही ते नीट पाळले तर तुमचे वजन नक्कीच कमी होईल.’ त्यानंतर कपिल शर्माने त्याच्या स्टारडमवर विनोद करत म्हटले, ‘पाहा माझे स्टारडम जॉन अब्राहम माझा डायटेशियन आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम एकाच वेळी तीन भूमिका साकारत आहे. जॉनने त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच असे केले आहे. त्यामुळे जॉनही त्याच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहे. जॉनने चित्रपटात जबरदस्त अॅक्शन केली आहे. तसेच उत्तमोत्तम वन लाइनर्स डायलॉग देखील बोलले गेले आहेत. अशा स्थितीत प्रत्येक बाजूने हा धमाकेदार चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी अपेक्षा आहे. **(हे वाचा:** सलमान खानने सेलिब्रेट केला वडील सलीम खान यांचा बर्थडे; मध्यरात्री शेअर केली….. ) दरम्यान, मुकेश भट्टच्या पुढील चित्रपटातदेखील जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमार दिसणार असल्याच्या बातम्या येत आहेत. या प्रोजेक्टवर जॉनने मुकेश भट्ट यांच्याशीही चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. आणि लवकरच त्याची अधिकृत घोषणा केली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या