JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Lata Mangeshkar यांच्या प्रकृतीसाठी घरात शिव रुद्र स्थापित, आशा भोसलेंनी दिली माहिती

Lata Mangeshkar यांच्या प्रकृतीसाठी घरात शिव रुद्र स्थापित, आशा भोसलेंनी दिली माहिती

गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी त्यांची बहिण प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी घरी शिव रुद्र स्थापित करण्यात आले असल्याची माहिती दिली.

जाहिरात

Lata Mangeshkar

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 जानेवारी: प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) सध्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना कोरोना (Covid 19) आणि न्युमोनियाची (Lata Mangeshkar corona and neumonia) लागण झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीची चिंता सर्वांनाच लागून आहे. दरम्यान, त्यांची बहीण आणि जगविख्यात गायिका आशा भोसले यांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी आम्ही प्रार्थना करत असून घरात शिव रुद्र स्थापित करण्यात आली असल्याची माहिती दिली. आशा भोसले यांनी ई टाईम्सशी संवाद साधला यावेळी त्यांनी लता दीदींच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. त्यांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा होण्यासाठी त्यांच्या घरी शिव रुद्र स्थापित करण्यात आले आहे. तसेच पुजा पाठदेखील सुरु आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लता दीदींच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. ‘लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मी ब्रीच कँडी रुग्णालयात अधिकार्‍यांशी चर्चा झाली असल्याचे टोपे यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच अधिकाऱ्यांना गायिकेच्या प्रकृतीबद्दल अपडेट देत रहावे, कारण लोकांना त्यांच्या प्रकृतीबद्दल जाणून घ्यायचे आहे. अशी सूचना देखील दिली असल्याचे टोपे यांनी यावेळी सांगितले. लता मंगेशकर यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली होती. त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. लता दीदींनी 1942 मध्ये वयाच्या 13 व्या वर्षी त्यांच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी अनेक भारतीय भाषांमध्ये 30 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या