मुंबई, 22 ऑगस्ट : स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘मी होणार सुपरस्टार; आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’. गेल्या बऱ्याच दिवसांपासून हा कार्यक्रम जोरदार चर्चेत आहे. महाराष्ट्राचा आवाज कोण ठरणार याची उत्सुकता लोकांना लागून होती. अखेर ही उत्सुकता आणि प्रतिक्षा संपली असून ‘मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’ विजेत्याचं नाव समोर आलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर याचीच चर्चा पहायला मिळत आहे. स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. मुंबईचा राम पंडीत, संगमनेरची वर्षा एखंडे, सांगलीचा लोककलेचे शिलेदार ग्रुप आणि गोव्याच्या जिग्यासा ग्रुपमध्ये महाअंतिम लढत रंगलेली पहायला मिळाली. अटीतटीच्या या लढतीत सांगलीच्या लोककलेचे शिलेदार ग्रुपने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. लोककलेचे शिलेदार या विजेत्या ग्रुपला तीन लाख आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. वेजेतेपद घोषित झाल्यापासून लोककलेचे शिलेदार ग्रुपवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय. हेही वाचा - Sonalee Kulkarni वर कोसळला दुःखाचा डोंगर, सर्वात जवळच्या व्यक्तीचं निधन ‘मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’ कार्यक्रमाचा उपविजेता मुंबईचा राम पंडीत ठरला आहे. जिग्यासा ग्रुपने तृतीय क्रमांक पटकावला तर संगमनेरच्या वर्षा एखंडेला उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल त्यांना गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाचं खा, वैशिष्ट्य म्हणजे, वयाचं बंधन नसल्यामुळे अगदी चार वर्षांच्या चिमुरड्यापासून 70 वर्षांच्या आजोबांपर्यंत प्रत्येकानेच या मंचावर आपली कला सादर केली. लोककलेचे शिलेदार ग्रुपनं विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना म्हटलं की, ‘हा दिवस स्वप्नवत असल्याची भावना लोककलेचे शिलेदार ग्रुपने व्यक्त केली. जिंकल्याचा आनंद तर नक्कीच आहे मात्र ही लोककला महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचावी ही इच्छा होती. स्टार प्रवाहच्या मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचा कार्यक्रमामुळे हे शक्य झालं. या मंचाने खूप गोष्टी शिकवल्या. पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देत आम्ही नवनवे प्रयोग केले. सलील कुलकर्णी, आदर्श शिंदे, बेला शेंडे यांसारखे गुरु लाभले याचा अतिशय आनंद आणि अभिमान आहे’. हेही वाचा - Hemant Dhome: ‘आता बरोबर एक वर्षाने…’; हेमंत ढोमेनं शेअर केली खास POST लोककलेचे शिलेदार जरी या पर्वाचे विजेते असले तरी महाअंतिम फेरीतील सर्वच स्पर्धकांनी या पर्वात आपली चमकदार कामगिरी दाखवली आहे. त्यामुळे सगळ्यांनीच प्रेक्षकांची मनं जिंकली असून सगळ्यांचं अभिनंदन केलं जात आहे.