अभिनेता ललित प्रभाकरचा (Lalit Prabhakar) ‘मीडियम स्पायसी’ (Medium Spicy) हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याआधी ललितने सिनेमातील त्यांचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्याच चक्क किचनमध्ये जेवण बनवताना दिसत आहे.
मराठीतील स्मॉर्ट आणि कुल अभिनेता ललित प्रभाकर लवकरच त्याचा 'मीडियम स्पायसी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे.
मीडियम स्पायसी हा सिनेमा येत्या 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमात ललित एका शेफची भूमिका साकारणार आहे. ज्याच नाव निस्सिम असं असणार आहे.
ललितने सिनेमातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत ज्यात त्याचे कुकिंग स्किल्स पहायला मिळत आहेत.
'शेफ निस्सिम... दाढी आणि स्किल्स ग्रो करताना', असं म्हणतं ललितने त्याचे फोटो शेअर केले आहेत.
किचनमध्ये शेफच्या वेशात जेवण बनवणाऱ्या ललितला पाहून त्याचे फॅन भलतेच खुश झाले असून ललितच्या नव्या लुकवरही सगळे फिदा झाले.