मुंबई, 24 सप्टेंबर : अभिनेता सैफ अली खान मागच्या बऱ्याच काळापासून बॉलिपासून दूर आहे. नुकताच त्याची वेब सीरिज सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन रिलीज झाला. त्यानंतर आता सैफ लाल कप्तान या सिनेमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. लाल कप्तानच्या टीझरमध्ये सैफला नागा साधूच्या लुकमध्ये पाहून सर्वच अवाक झाले होते. त्यानंतर आता या सिनेमाच्या ट्रेलरचा पहिला भाग नुकताच रिलीज झाला असून यात सैफ अली खानचं अतिशय भयंकर रुप पाहायला मिळत आहे. लाल कप्तानच्या या ट्रेलरमध्ये सैफ अली खान खूपच हिंसक रुपात दिसत आहे. क्लोजअप शॉट, कपाळावर राख आणि लाल टीळा, डोळ्यात काजळासोबतच थरकाप उडवणारी दहशत. या सिनेमात एका नागा साधूच्या बदल्याचा पर्वास पाहायला मिळणार आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच सैफ घोड्यावर बसून एका माणसाचं प्रेत खेचत नेताना दिसत आहे. Bigg Boss 13: पाहा कसं दिसतंय नव्या सीझनचं नवं घर
हा ट्रेलर ऑफिशयल ट्रेलर फर्स्ट पार्ट- द हंट या नावानं रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरच्या सुरुवातीचा सैफचा डायलॉग ‘आदमी के पैदा होते ही काल भैंसे पर बैठकर चल पड़ता है. उसे वापस लाने के लिए. आदमी की जिंदगी उतनी, जितना समय उस भैंसे को लगा उस तक पहुंचने में.’ थरकाप उडवणारा आहे. याशिवाय यामध्ये सोनाक्षी सिन्हाचा व्हॉइस ओव्हर ऐकायला मिळतो. सोशल मीडियावर या ट्रेलर खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विशेष करुन सैफचा लुक आणि अभिनय याचं कौतुक होत आहे. अभिनेत्री अॅमी जॅक्सन झाली आई, शेअर केला बाळाचा पहिला फोटो
हा सिनेमा येत्या 11 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. सुरुवातीला हा सिनेमा 6 सप्टेंबरला रिलीज होणार होता मात्र नंतर काही कारणास्तव ही डेट बदलण्यात आली. अनुष्का शर्माच्या NH10 चं दिग्दर्शन करणाऱ्या नवदीप सिंह यांनीच हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. तर सिनेमाची निर्मिती आनंद एल राय यांची आहे. सिनेमाच्या कथेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचं आनंद एल राय सांगतात. या सिनेमात सैफ व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, झोया हुसैन, दीपक डोबरियाल आणि मानव विज यांच्या महत्तवाच्या भूमिका आहेत. असं काय झालं की, Bigg Boss 13 च्या इव्हेंटमध्ये फोटोग्राफरवर भडकला सलमान ========================================================== स्मिता गोंदकरने दिली ग्रॅण्ड पार्टी! सेलिब्रिटींची फुल टू धमाल! पाहा VIDEO