JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मनमोकळा श्वास घेतो भिजल्या....' पहिला पाऊस पडताच कुशल बद्रिकेने शेअर केली रोमॅण्टिक पोस्ट

'मनमोकळा श्वास घेतो भिजल्या....' पहिला पाऊस पडताच कुशल बद्रिकेने शेअर केली रोमॅण्टिक पोस्ट

पाऊस आणि प्रेमाचं तसं खूप जुनं नातं आहे. या पहिल्या पावसावर कुशलने रोमॅण्टिक अंदाजात खास पोस्ट लिहिली आहे. त्याच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

जाहिरात

पहिला पाऊस पडताच कुशल बद्रिकेने शेअर केली रोमॅंटिक पोस्ट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 जून - ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावरून घराघरांत लोकप्रिय झालेले नाव म्हणजे कुशल बद्रिके होय. विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का अशी त्याची ओळख सांगितली जाते. कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. अनेकदा तो त्याच्या आगामी नाटकांची, चित्रपटांची माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतो. कुशलचा अलीकडे सोशल मीडियावरचा वावर वाढला आहे. पावसाळा सुरू झाला आहे, पाऊस आणि प्रेमाचं तसं खूप जुनं नातं आहे. या पहिल्या पावसावर कुशलने रोमॅण्टिक अंदाजात खास पोस्ट लिहिली आहे. त्याच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कुशलने पोस्टमध्ये लिहिलं आहे. आता पहिल्या पावसात भिजायला जात नाही मी, कोसळू देतो त्याला तुझ्या आठवांसारखा. मात्र मनमोकळा श्वास घेतो भिजल्या मातीचा… तुझ्या केसांसारखा….(सुकुन)”. या पोस्टवर नेटकऱ्यांनी असंख्य कमेंट्स केल्या आहेत.पावसाचं आणि कवितेचं जुनं नातं आहे. अनेक जण पावासावर कविता करताना दिसतात. म्हणूनच की काय,अनेकांनी त्याला पहिल्या पावसावर कविता करण्याची विनंतीही केली आहे.

कुशल बद्रिके सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. नेहमी तो भन्नाट व्हिडिओ शेअर करत असतो. पांडू सिनेमाच्या सेटवरली देखील त्याने काही व्हिडिओ शेअर केले आहेत. शिवाय तो चला हला येऊ द्याच्या सेटवरून कधी भाऊ कदम तर कधी श्रेया बुगडेसोबत व्हिडिओ शेअर करत असतो. त्याचा सोशल मीडियावर एक वेगळा चाहता वर्ग आहे.तसेच कुशल सध्या चित्रपटांमध्येसुद्धा व्यग्र आहे.

संबंधित बातम्या

कुशलने काही दिवासंपूर्वीच बायकोच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली होती. कुशलची पत्नी सुनयना ही उत्तम कथक डान्सर आहे. ती ‘मुघल-ए-आझम’ या म्युझिकल शोसाठी परदेसशात गेली होती. त्यामुळे अभिनेत्याने बायकोच्या आठवणीत खास पोस्ट शेअर केली होती. कुशल त्याच्या बायकोवर खूप प्रेम करतो. त्याची जवळची मैत्रिण अभिनेत्री श्रेया बुगडे हिनं देखील याबद्दल एका कार्यक्रमात सांगितले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या