मुंबई, 22 फेब्रुवारी- मनोरंजन सृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या प्रेग्नेंसीच्या शेवटच्या (Pregnancy) टप्प्यापर्यंत शूटिंग करण्याला प्राधान्य दिलं आहे. यातीलच एक छोट्या पडद्यावरील अभिनेत्री म्हणजे पूजा बॅनर्जी होय. पूजा बॅनर्जी (Pooja Banerjee) सध्या ‘कुमकुम भाग्य’ (Kumkum Bhagya) या एकता कपूरच्या (Ekta Kapoor) प्रचंड लोकप्रिय मालिकेत काम करत आहे.पूजा बॅनर्जी लवकरच आई होणार असून सध्या ती गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत तिने ‘कुमकुम भाग्य’ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी तिने तिच्या शेवटच्या भागाचे शूटिंग पूर्ण केले. यावेळी मालिकेच्या संपूर्ण टीमने तिला खास सरप्राईज दिले. तिचे सहकलाकार आणि टीम मेंबर्सचे प्रेम पाहून पूजा बॅनर्जी भावुक झाली होती. ‘कुमकुम भाग्य’मध्ये पूजा बॅनर्जीने रियाची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री पूजा बॅनर्जीने तिच्या फेअरवेल पार्टीची एक झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री रिहाना पंडित रडत असून पूजा बॅनर्जी तिला शांत करताना दिसत आहे. पूजा बॅनर्जीने या व्हिडिओसोबत एक लांबलचक कॅप्शहीही दिले आहे. तिने लिहिले, ‘या सुंदर प्रवासासाठी ‘कुमकुम भाग्य’च्या टीमचे आभार. माझ्या गरोदरपणात मला इतकं स्पेशल ट्रीट करण्यासाठी खूप धन्यवाद. सेटवर माझ्यावर इतकं प्रेम केल्याबद्दल मी संपूर्ण टीमची आभारी आहे’. तिने पुढे लिहिले, ‘मला वाटते की महिला खरोखरच सशक्त झाल्या आहेत. आणि एक स्त्री करू शकत नाही अशी कोणतीच गोष्ट नाही. माझ्या प्रेग्नेन्सी काळातही सेटवर मला आराम, काळजी आणि प्रेम मिळालं आहे.’ यासोबतच पूजा बॅनर्जीने एकता कपूर आणि बालाजी टेलिफिल्म्सचेही आभार मानले आहेत. पूजा बॅनर्जी याआधीही अनेक सुपरहिट शोमध्ये दिसली आहे.
तिने ‘एक दुसरेसे करते है प्यार हम’, ‘घर आजा परदेसी’, ‘चंद्रनंदिनी’, ‘दिल ही तो है’ आणि ‘कसौटी जिंदगी के 2’ सारख्या प्रचंड गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं असते. ती सतत तिचे फोटो आणि विविध व्हिडीओ शेअर करत असते. ‘कुमकुम भाग्य’ मलिककेतील पूजा बॅनर्जीची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली होती. परंतु सध्या आपल्या प्रेग्नेन्सीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तिने या मालिकेचा निरोप घेतला आहे. मार्च महिन्यात ती बाळाला जन्म देणार आहे.