JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / KRK: दोन वर्षांपूर्वीच ते ट्विट पडलं महागात; केआरकेला झाली अटक

KRK: दोन वर्षांपूर्वीच ते ट्विट पडलं महागात; केआरकेला झाली अटक

बॉलिवूड अभिनेता केआरके अर्थातच कमाल राशिद खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखला जातो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 ऑगस्ट- बॉलिवूड अभिनेता केआरके अर्थातच कमाल राशिद खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखला जातो. असच एक वक्तव्य त्याला चांगलंच महागात पडलं आहे. 2020 मधील एका वादग्रस्त ट्विटमुळे त्याला अटक केल्याची बातमी समोर आलीआहे. तो सतत ट्विटरवर वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत असतो. केआरके सतत सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त करत असतो. त्याच्या प्रत्येक पोस्टने तो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतो. तो बऱ्याचवेळा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. मात्र केआरकेला आपलं दोन वर्षांपूर्वीचं एक ट्विट चांगलंच भोवलंय. त्याला मुंबई पोलिसांनी अटकदेखील केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, केआरके विरोधात मुंबईच्या मालाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, केआरकेला त्याच्या दोन वर्षामागील एका ट्विटमुळे ही अटक झाली आहे. या अभिनेत्याने 2020 मध्ये एक वादग्रस्त ट्विट केलं होतं. या ट्विटमुळे तो कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मालाड पोलिसांनी अभिनेत्याला एयरपोर्टवरुनच चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर आज त्याला बोरिवली पोलीस ठाण्यात हजर केलं जाणार आहे. (हे वाचा: न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंहची पोलिसांकडून 2 तास चौकशी; विचारले ‘हे’ महत्त्वाचे प्रश्न ) 2020 मधील ‘ते’ ट्विट भोवलं- केआरके अर्थातच कमाल राशिद खान नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. अभिनेत्याने दोन वर्षांपूर्वी एक ट्विट केलं होतं, ज्याचा परिणाम म्हणून आता त्याला अटक करण्यात आली आहे. अभिनेत्याने 2020 मध्ये एक ट्विट केलं होतं. या ट्विटमुळे धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य करत भावना दुखावल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. युवा सेनेचे सदस्य राहुल कनाल यांनी केआरकेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता अभिनेत्याला अटक झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या