JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Lockdown दरम्यान टायगर-दिशा राहतायत लिव्ह इनमध्ये? कृष्णा श्रॉफनं सांगितलं सत्य

Lockdown दरम्यान टायगर-दिशा राहतायत लिव्ह इनमध्ये? कृष्णा श्रॉफनं सांगितलं सत्य

बॉलिवूडचं बहुचर्चित कपल टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी लॉकडाऊन दरम्यान लिव्ह इनमध्ये राहत असल्याचं बोललं जात होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे सध्या देशात सर्वच ठिकाणी 3 मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे बॉलिवूड सेलिब्रेटी सुद्धा सध्या आपापल्या घरीच आहेत. बॉलिवूडमधील अनेक कपल्स सध्या एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करत आहेत. घटस्फोट झालेला असतानाही मुलांसाठी सुझैन खान हृतिकच्या घरी राहत आहे. कृति खरबंदा आणि पुलकित सम्राट सध्या लिव्ह-इनमध्ये राहत आहेत. अशात बॉलिवूडचं बहुचर्चित कपल टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी लॉकडाऊन दरम्यान लिव्ह इनमध्ये राहत असल्याचं बोललं जात होतं. पण आता टायगरची बहीण कृष्णा श्रॉफनं यामागचं सत्य सांगितलं आहे. दिशा पाटनी तिच्या अभिनयासोबच टायगर श्रॉफसोबतच्या नात्यामुळे नेहमी चर्चेचा विषय ठरते. मागच्या बऱ्याच काळापासून हे दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत बोलताना टायगरची बहीण कृष्णा म्हणाली, दिशा आणि टायगर एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. पण ते दोघंही लिव्ह-इनमध्ये राहत नाही आहेत. दिशाचं घर टायगर ज्या ठिकाणी त्याच्या अगदीच बाजूला आहे. त्यामुळे ते दोघंही घरातल्या सामानाच्या शॉपिंगसाठी कधी कधी एकत्र बाहेर पडतात. लॉकडाऊनच्या प्रेमात आहे ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री,शेअर केला बिकिनीतील फोटो

कृष्णा म्हणाली, टायगरसोबत दिशाचं बॉन्डिंग खूपच चांगलं आहे. मागच्या बऱ्याच वर्षांपासून ते दोघंही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड आहेत. या मुलाखतीत कृष्णानं टायगर-दिशाच्या रिलेशनशिपबद्दल बोलणं टाळलं. मात्र दिशाची कंपनी तिला स्वतःलाही खूप आवडते हे तिनं कबुल केलं. फिटनेसबाबत ती दिशा खूपच जागरुक असते आणि तिचा उत्साह नेहमीच समोरच्याला उर्जा देतो असंही कृष्णानं यावेळी सांगितलं. न्यूड फोटोंवर तिने दिलं स्पष्टीकरण, VIDEO शेअर करत म्हणाली,‘माझ्यात दैवी शक्ती’

कृष्णा म्हणाली, टायगरला नेहमीच एकटं राहायला आवडतं. त्यामुळे मला वाटतं दिशा खरंच एक कूल मुलगी आहे. ज्यामुळे टायगरला तिच्यासोबत एवढा वेळ स्पेंड करायला आवडतं. वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर दिशा शेवटची मलंग सिनेमात दिसली होती. या सिनेमा प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. याशिवाय लवकरच ती सलमान खानच्या राधे सिनेमात दिसणार आहे. ज्यात अभिनेता रणदीप हुड्डाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. (संपादन : मेघा जेठे.) दुबईमध्ये अडकलेल्या सोनू निगमच्या अटकेची मागणी,‘अजान’बाबत वादग्रस्त ट्वीट VIRAL

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या