मुंबई, 2 मे : बॉलिवूडमध्ये स्टार किड्सच्या डेब्यूची चर्चा होणं तसं पाहिलं तर नवीन नाही. पण बी टाऊनमध्ये असे काही स्टार किड्स आहेत ज्यांना लाइम लाइटमध्ये राहणं अजिबात आवडत नाही. मात्र हे स्टार किड्स सोशल मीडियावर मात्र खूप सक्रिय आहेत. यापैकीच एक आहे जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफ आहे. कृष्णा बॉलिवूडपासून दूर आहे. मात्र सोशल मीडियावर तिचा स्वतःचा वेगळा चाहता वर्ग आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते. नुकतेच कृष्णानं तिच्या इन्स्टाग्रामवर बॉयफ्रेंडसोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. जे खूप व्हायरल होताना दिसत आहेत. कृष्णा श्रॉफनं तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा बॉयफ्रेंड एबन हेम्ससोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ते दोघंही एकमेकांना किस करताना दिसत आहेत. कृष्णा आणि एबनचे हे रोमँटिक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. या फोटोंमध्ये या दोघांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी कृष्णानं एबनसोबतचे सर्व फोटो डिलिट केल्यानं या दोघांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जात होतं मात्र आता पुन्हा एकदा कृष्णा एबनसोबत सिझलिंग फोटो शेअर करत त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. रणवीर सिंह असा झाला होता ‘मुराद’, पाहा ‘गली बॉय’चे UNSEEN PHOTOS
कृष्णा श्रॉफ बास्केटबॉल प्लेयर एबन हेम्सला डेट करत आहे. कृष्णानं कधीच तिचं नातं लपवून ठेवलं नाही. ती नेहमीच तिच्या नात्याबद्दल बिनधास्त बोलली आहे आणि असे फोटो शेअर करण्याची तिची ही पहिलीच वेळ नाही तर याआधीही तिनं अनेक वेळा अशाप्रकारचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. कृष्णाचे हे फोटो लॉकडाऊनच्या अगोदरच्या व्हेकेशन दरम्यान क्लिक केलेले आहेत. मेघा घाडगेनं घरात राहून फेसबुक लाइव्हवर केली लॉकडाऊन लावणी, पाहा VIDEO एबन हेम्स कृष्णाचा बॉयफ्रेंड असला तरीही तो टायगर श्रॉफचाही चांगला मित्र आहे. एबननं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, टायगर त्याचा मित्र असूनही त्याला टायगरला एक बहीण आहे हे माहित नव्हतं. कृष्णा आणि एबन एका फ्रेंड पार्टीमध्ये पहिल्यांदा भेटले होते. Instagram च्या माध्यामातून महिन्याला लाखो रुपये कमावते ही मॉडेल!