JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अभिनेत्री यामी गौतमची ही हॅण्डबॅग चर्चेत; किंमत जाणून व्हाल थक्क

अभिनेत्री यामी गौतमची ही हॅण्डबॅग चर्चेत; किंमत जाणून व्हाल थक्क

यामी गौतम बुधवारी (6 ऑक्टोबर) मुंबई विमानतळावर दिसली. त्यावेळी यामी गौतमच्या हातात असलेल्या महागड्या हँडबॅगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 08 ऑक्टोबर : बॅग हा जवळपास प्रत्येक महिलेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. विविध प्रसंगांना अनुसरून वापरता येतील अशा चार ते पाच बॅग तर प्रत्येकीजवळ असतातच. त्यात ती एखादी बॉलीवूड अभिनेत्री असेल तर मग विचारूच नका. प्रत्येक वेशभूषेला शोभून दिसेल, अशा कितीतरी महागड्या बॅग्ज त्यांच्याकडे असतात. अशीच एक बॉलिवूड अभिनेत्री आपल्या महागड्या बॅगमुळे चर्चेत आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) नुकतीच पती आदित्य धरसोबत (Aditya Dhar) मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) दिसली होती. लग्नानंतर पहिल्यांदाच हे दाम्पत्य एकत्र बाहेर दिसलं. नेहमीप्रमाणे पारंपरिक ड्रेसमध्ये यामी खूपच सुंदर दिसत होती; पण या वेळी तिचा ड्रेस किंवा दागिन्यांनी नव्हे, तर तिच्या हातातल्या बॅगनं (Handbag of Yami Gautam) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 1600 कोटींची मालकीण आहे किंग खानची पत्नी, जाणून घ्या गौरीविषयी… यामी गौतम बुधवारी (6 ऑक्टोबर) मुंबई विमानतळावर दिसली. तेव्हा ती पेस्टल गुलाबी पलाझो सूट आणि काळ्या रंगाच्या गॉगल्समध्ये नेहमीसारखीच सुंदर दिसत होती. लग्न झाल्यापासून यामी नेहमी बांगड्या आणि मंगळसूत्र घालून फिरताना दिसते. यामीचा पती आदित्य काळ्या रंगाच्या लेदर जॅकेटमध्ये डॅशिंग दिसत होता. दोघांनीही मास्क घालून कोरोना नियमांचं पालन केल्याचं दिसत होतं. त्यावेळी यामी गौतमच्या हातात असलेल्या महागड्या हँडबॅगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अतिशय साधा लूक असलेल्या या चॉकलेटी रंगाच्या बॅगची किंमत 1 लाख 26 हजार रुपये आहे.

संबंधित बातम्या

‘विकी डोनर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या यामी गौतमचा सुंदर आणि निरागस अभिनेत्रींमध्ये समावेश होतो. लग्नानंतर ती अधिक सुंदर दिसू लागली आहे. काही दिवसांपूर्वीच यामीनं तिच्या त्वचेच्या आजाराबद्दल सोशल मीडियावर माहिती उघड केली होती. यावर्षी जून महिन्यामध्ये यामी गौतम आणि आदित्य धर यांनी हिमाचली रीतिरिवाजानुसार लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. आदित्य धर ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. या चित्रपटात विकी कौशलसह यामीनंदेखील अभिनय केला होता. नवरात्री आधीच Sara Ali Khan ने घेतले करणी माताचं दर्शन कामाबद्दल बोलायचं झाल्यास, यामी गौतमनं सैफ अली खान आणि जॅकलिन फर्नांडिससोबत ‘भूत पोलीस’ या चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये गेलेल्या यामीने चित्रपटाशी संबंधित काही भन्नाट किस्सेदेखील प्रेक्षकांना सांगितले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या