मुंबई, 16 डिसेंबर- झी मराठीवर 15 डिसेंबरपासून किचन कल्लाकार हा शो सुरू झाला आहे. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतीच या सेटवर माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री प्रार्थन बेहेरेने हजेरी लावली. यावेळी तिनं माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या सेटवरच्या काही गमतीजमती शेअर केल्या. विशेष म्हणजे तिनं श्रेयश तळपदेची पोलखोल केली. झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टावर किचन कल्लाकारचा प्रोमो शेअर केला आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यावेळी या शोमध्ये हजेरी लावली. पिंक रंगाच्या ड्रेसमध्ये प्रार्थना खूपच सुंदर दिसत होती. यावेळी शोचा होस्ट आणि माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत जयच्या मित्राच्या भूमिका साकारणाऱ्या संकर्षण कऱ्हाडेणे सेटवरच्या गमतीजमतीविषयी विचारले. यावेळी प्रार्थनाने श्रेयश तळपदेचा अभिनय करून दाखवला त्याचा एक किस्सा शेअर केला. वाचा : लेखिका आणि प्रसिद्ध अभिनेत्रीची ‘ठिपक्यांची रांगोळी’मालिकेत होणार एंट्री प्रार्थना म्हणाली, मला माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचा पहिला भाग शूट करताना वाटले होते श्रेयश खूप शांत असेल. पण जेव्हा त्यानं पहिल्या शॉटच्या आधी माझी तुझी रेशीमगाठ ..हे गाण त्याच्या आवजात म्हटलं. त्यावेळी स्पॉट बॉयपासून सगळेच दचकल्याचे सांगितले. श्रेयश असं देखील गाण म्हणू शकतो असं यावेळी प्रार्थना म्हणाली.अशाप्रकारची मस्ती सेटवर देखील सुरू असल्याचे यावेळी प्रार्थनाने सांगितले. यावेळी तिनं . श्रेयशचा सेटवरचा वावर कसा असतो याबद्दल सांगितलं. श्रेयशचे गाण्याचं सीक्रेट तिनं यावेली सर्वांसमोर सांगिकृतलं.
किचन कल्लाकारच्या सेटवर मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार हजेरी लावत आहेत. या शोच्या परिक्षकाच्या भूमिकेत प्रशांत दामले काम पाहत आहेत. तर शो होस्ट करण्याची जबाबदारी संकर्षण कऱ्हाडे करत आहे. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.