JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bus Bai Bus: खड्डेमुक्त मुंबई शक्य आहे का?; पाहा काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर

Bus Bai Bus: खड्डेमुक्त मुंबई शक्य आहे का?; पाहा काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर

झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारा कार्यक्रम ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाला माजी महापौर किशोरी पेडणेकर हजेरी लावणार असून रोखठोक प्रश्न उत्तर सेशन होणार असल्याचं समोर आलेल्या व्हिडीओवरुन पहायला मिळतंय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 ऑगस्ट : झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारा कार्यक्रम ‘बस बाई बस’ सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे सांभाळत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला या कार्यक्रमात सहभागी होत असलेल्या पहायला मिळतात. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना सुबोध भावे निरनिराळे प्रश्न विचारतात. नुकतंच या कार्यक्रमाला माजी महापौर किशोरी पेडणेकर हजेरी लावणार असून रोखठोक प्रश्न उत्तर सेशन होणार असल्याचं समोर आलेल्या व्हिडीओवरुन पहायला मिळतंय. ‘बस बाई बस’ च्या आगामी भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यामध्ये किशोरीताई पेडणेकर पुढच्या भागातील पाहुण्या असल्याचं दिसतंय. याशिवाय सुबोध भावे त्यांना भन्नाट प्रश्न विचारत आहेत. प्रोमोमध्ये अभिनेता सुबोध भावे राजकारणाशी निगडीत काही प्रश्न किशोरी पेडणेकर यांना विचारताना दिसत आहे. या प्रश्नांची उत्तरही पेडणेकर रोखठोख पद्धतीनं देताना दिसतायेत. शिवसेनेला सत्तेत येण्यासाठी सोडून गेलेल्या आमदारांचं मन वळवावं लागेल का?, असाही प्रश्न सुबोध बावे विचारतात. यावर किशोरीताईं म्हणाल्या, ‘हो आमदारांचं मन वळवण्याचा आम्ही प्रयत्न केला. झाडाला जशी नवी पालवी फुटते तशी आमच्या शिवसेना पक्षालाही फुटेल आमचा बाळासाहेबांचा पक्ष जसा आहे आजही तसाच आहे. आम्हाला जिंकून देणारे लोक आजही आमच्याबरोबर आहेत’.

संबंधित बातम्या

सुबोध भावेंनी यावेळी महापालिकेत भ्रष्टाचार होतो का असंही किशोरीताईंना विचारलं. यावर त्या म्हणाल्या ‘नाही’. पुढे सुबोध भावेंनी विचारलं, खड्डेमुक्त मुंबई शक्य आहे का?, यावर त्या म्हणाल्या हो. सुरुवात झाली आहे. गेल्यावर्षीपासून सुरुवात झालीये यावेळी त्यामानाने कमी खड्डे आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी खोटी आश्वासनं द्यावी लागतात का?, यावर त्यांनी म्हटलं की, आमच्या पक्षानं जे बोललं आहे ते केलं आहे. त्यामुळे नाही. हेही वाचा -  Salman Khanची इंडस्ट्रीत 34 वर्षे पूर्ण: या खास दिवशी केली नव्या चित्रपटाची घोषणा, ‘हे’ असणार नाव दरम्यान, प्रोमो आल्यापासून पुढच्या भागाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. किशोरी पेडणेकर यांनी बस बाई बसच्या मंचावर रोकठोक दिलेली उत्तर लवकरच आपल्याला पहायला मिळणार आहे. याशिवाय या भागात आणखी काय धमाल होणार हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या