KGF 2 Yash
मुंबई 14 ऑगस्ट: सध्या बॉलिवूड विरुद्ध साऊथ असा एक मोठा वाद सुरु आहे. एकीकडे अर्ध वर्ष सरलं तरी बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडपेक्षा साऊथच्या स्टार आणि सिनेमांची चलती असल्याचं दिसून आलं आहे. या वर्षात प्रशांत नील यांच्या KGF 2 ने लक्षणीय कामगिरी करत अनेक रेकॉर्ड मोडून काढले. साऊथच्या एका हिंदी डब व्हर्जन सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणं अनपेक्षित होतं. रिलीजनंतर एवढे दिवस झाले तरी सध्या (rocking star yash) KGF 2 फेम यश म्हणजे रॉकी भाईची जादू कायम राहिल्याचं दिसत आहे.
सध्या सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष बॉलिवूडच्या बड्या स्टारकडे आहे. जिकडे आमिर अक्षयचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर हवी तशी कामगिरणी करत नाहीयेत तिथे KGF 2 आता टीव्हीवर दिसून येणार असेल तरी त्याची चर्चा अधिक होताना दिसत आहे. येत्या काळात सोनी टीव्हीवर सुद्धा KGF 2 दिसून येणार आहे.
2022 वर्षात अनेक सिनेमे आले आणि गेले. त्यातील मोजक्या सिनेमांनी प्रेक्षकांना खुश केलं. यामध्ये मराठी सिनेमे सुद्धा प्रेक्षकांना पसंत पडले पण बॉलिवूडची गाडी अजूनही म्हणावी तशी रुळावर आलेली नाही. या सगळ्यात रॉकिंग स्टार यश मात्र सुपरडुपर भाव खाऊन गेला आहे. त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत प्रेक्षकांना सलाम रॉकीभाई म्हणायला भाग पाडलं आहे. यशच्या या अंदाजाला मागच्या काही वर्षात अनेकांनी माज आणि अहंकार असं नाव दिल असल्याचं सांगण्यात येत आहे. या सगळ्याबद्दल यशने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं, “सर्वांमध्ये कमालीचा आत्मविश्वास असायलाच हवा. कन्नड सिनेमाला आत्ता देशभरात जेवढा सन्मान मिळतो आहे तो याआधी मिळाला असता यावर कोणी विश्वास ठेवेल का? मला याबद्दल अभिमानाने बोलावसं वाटतं.
हे ही वाचा-
Raju Srivastav health update: राजू श्रीवास्तव यांच्या हेल्थसंदर्भात महत्त्वाचा अपडेट; MRI रिपोर्ट समोर
कारण यामध्ये केवळ सकारात्मक ऊर्जा आहे. मी आत्ता जेवढ्या आत्मविश्वासाने बोलतो त्याच रवैय्याला आधी काही वर्षांपूर्वी अहंकार आणि बेफिकीर पणा म्हटलं गेलं आहे. जेव्हा तुमचं बोलणं, विचार आणि कृती या तिन्ही गोष्टी चांगल्या असतील तुमच्यासोबत नेहमी चांगलंच होईल. जगात चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवणारे लोक आहेत.”
KGF 2 बद्दल सांगायचं तर 900 कोटींच्या आसपास कमाई करणारा हा वर्षातील सगळ्यात मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. तसंच रॉकिंग स्टार यशचा हा सिनेमा सर्वाधिक बॉक्स ऑफिसवर ओपनिंग करणारा सिनेमा सुद्धा ठरला आहे.