JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / KBC 14: हॉट सीटवर बसण्यापूर्वी स्पर्धकानं काढला शर्ट, अमिताभ बच्चनलाही बसला धक्का

KBC 14: हॉट सीटवर बसण्यापूर्वी स्पर्धकानं काढला शर्ट, अमिताभ बच्चनलाही बसला धक्का

‘कौन बनेगा करोडपती14’ च्या मंचावर जलद उत्तर देणाऱ्या स्पर्धकाच्या नावाची घोषणा करण्यात आली. उत्साहाच्या भरात स्पर्धक आपला शर्ट काढून पळत सुटला. पाह व्हिडीओ

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 ऑगस्ट : ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचा प्रत्येक सीझन खूप लोकप्रिय ठरतो. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या चौदाव्या सीझनलाही प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळत असल्याचं पहायला मिळतंय. प्रत्येक सीझनमध्ये सहभागी होणारे स्पर्धक खूप उत्साही असतात. अशातच यंदाही एक स्पर्धक खूप जास्त उत्साही दिसून आला. उत्साहाच्या भरात स्पर्धक आपला शर्ट काढून पळत सुटला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ‘कौन बनेगा करोडपती14’ च्या मंचावर जलद उत्तर देणाऱ्या स्पर्धकाच्या नावाची घोषणा करण्यात आली. विजय गुप्ता असे या स्पर्धकाचे नाव. विजय गुप्ता यांना हॉट सीटवर जाऊन इतका आनंद झाला की त्यांनी उत्साहाच्या भरात आपला शर्टच काढला. शर्ट काढून शोच्या संपूर्ण सेटवर ते पळताना दिसले. स्पर्धकाला पाहून यावेळी अमिताभ बच्चनही थक्क झाले. अमिताभ यांनी स्पर्धकाला शर्ट घालण्यास सांगितले. अमिताभ यावेळी स्पर्धकाला म्हणतात की, मला शंका आहे की, तुमचे बाकीचे कपडेही नाही निघावे. यावर सेटवर एकच हशा पिकतो. विजय गुप्ता यांचा केबीसी 14 च्या सेटवरील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक भन्नाट कमेंटही येताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या

सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणारा रिअॅलिटी क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’ भारतातील अनेकांचा आवडता शो आहे. आत्तापर्यंत या शोचे 13 सीझन यशस्वीरित्या पूर्ण झाले असून सध्या 14 वा सीझन चांगलाच गाजत आहे. यावेळीही ‘कौन बनेगा करोडपती 14’ च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी यावेळीही बिग बी अमिताभ बच्चनच सांभाळत आहेत. हेही वाचा -  Urfi Javed ने पापाराझींसमोर ‘हे’ काय काढलं ड्रेसमधून, सोशल मीडियावर रंगली चर्चा दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांना तिसऱ्यांदा कोविड झाला होता. सध्या ते आयसोलेशनमध्ये आहेत. त्यामुळे आगामी बागाचे शुटिंग कसे होईल याची चिंता प्रेक्षकांनी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या