मुंबई, 20 सप्टेंबर : अमिताभ बच्चन यांचा क्विज शो कौन बनेगा करोडपतीचा 11 वा सीझन सध्या खूपच चर्चेत आहे. हॉट सीटवर बसलेला स्पर्धक, त्याला विचारले जाणारे प्रश्न हे सर्व पाहिल्यावर प्रत्येकालाच वाटतं की आपण तिथे असायला हवं होतं. मी सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर देऊन करोडपती झालो असतो तर असा विचार आपल्या मनात आल्याशिवाय राहत नाही. पण आता तुमचं हे स्वप्न पूर्ण होणं शक्य आहे. आता करोडपती होण्यासाठी हॉट सीटवर बसण्याची गरज नाही. केबीसी 11 मध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तर देऊन आता तुम्ही घरबसल्या करोडो रुपये जिंकू शकता. चला तर मग जाणून घेऊया हे कसं शक्य आहे ते… केबीसीच्या मेकर्सनी प्रेक्षकांसाठी एक नामी युक्ती शोधली आहे. ज्यामुळे तुम्ही हॉट सीटवर न बसता फक्त केबीसीच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकत नाही तर त्यासोबतच करोडो रुपये सुद्धा जिंकू शकता. यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबइलमध्ये SonyLiv अॅप डाऊनलोड करावं लागेल. या अॅपवर KBC Play Along च्या मदतीनं केबीसीमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तर देऊन कॅश प्राइझ जिंकू शकता. एवढंच नाही तर याच्या मदतीनं तुम्हाला अमिताभ यांच्या समोर हॉट सीटवर बसून खेळण्याची संधी सुद्धा मिळू शकते. मुलीला KISS केल्यानं ‘या’ बॉलिवूड दिग्दर्शकाला मिळाली होती जीवे मारण्याची धमकी
या अॅपद्वारे खेळताना तुम्हाला 7 कोटीचा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहित असेल तर तुम्ही KBC Play Along जिंकून टॉप 10 विनर्सच्या यादीत पोहोचू शकता. अधिकाधिक गुण मिळवणाऱ्यां स्पर्धकांमधून 10 नशीबवान विजेत्यांची नाव घोषित केली जातील. KBC-11च्या सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार या खेळातून स्पर्धक रोज 10 हजारापर्यंतचं कॅश प्राइझ जिंकत आहेत. आतापर्यंत कॅश प्राइझ जिंकणाऱ्यांची संख्या 60 हजार पर्यंत जाऊन पोहोचली आहे. मात्र 7 कोटीची रक्कम जिंकण्यासाठी काही अटी आणि नियमांचं पालन करणं सुद्धा बंधनकारक आहे. …आणि सैफ अली खान चक्क स्वतःच्याच घरचा पत्ता विसरला! केबीसीच्या आतापर्यंतच्या एपिसोड बद्दल बोलायचं तर नुकतंच महाराष्ट्राच्या अमरावती येथील रहिवासी बबिता ताडे यांनी गुरुवारी 1 कोटीची रक्कम जिंकली. त्यांनी एक्सपर्टच्या सल्ल्याची लाइफलाइन घेत एक कोटीच्या प्रश्नाचं अचूक उत्तर देत 1 कोटीची रक्कम जिंकली. पण 7 कोटीचा प्रश्न क्वीट केला. येत्या एपिसोडमध्ये राजस्थानची रुमा देवी हॉट सीटवर बसलेली दिसणार आहे. मिसेस मुख्यमंत्री : लग्नात सुमीनं समरला दिलं ‘हे’ सरप्राइझ गिफ्ट ======================================================= VIDEO : ‘सगळे सण एकत्र आले’, खिचडीवाल्या ‘करोडपती’ बबिता ताडेंशी खास बातचीत