अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल (Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding) यांचा लग्नसोहळा या वर्षात सर्वात जास्त चर्चा झालेला सोहळा होता. या सोहळ्याच्या फोटोज, विकी-कतरिनाची एक झलक पाहण्यासाठी अनेकांनी तारेवरची कसरत देखील केली होती.
अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा लग्नसोहळा या वर्षात सर्वात जास्त चर्चा झालेला सोहळा होता. या सोहळ्याच्या फोटोज, विकी-कतरिनाची एक झलक पाहण्यासाठी अनेकांनी तारेवरची कसरत देखील केली होती. मात्र त्यांचे फोटोज समोर यायला बराच वेळ लागला. आता उभयतांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरुन त्यांच्या बिग फॅट वेडिंगचे फोटोज शेअर केले जात आहेत.
आता कतरिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिने लग्नात कशी एंट्री केली याचे फोटो शेअर केले आहेत. यात अभिनेत्री फारच स्टनिंग दिसत आहे.
कतरिनाचा हा लुक 'वेडिंग गोल्स' देणारा ठरत आहे. लाल रंगाचा लेहंगा आणि त्यावर परिधान केलेले पारंपरिक पण ट्रेंडी दागिने कतरिनाच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहे.
यावेळी कतरिनाने असं कॅप्शन दिलं आहे की, मोठे होताना आम्ही बहिणींनी नेहमी एकमेकांचे रक्षण केले. ते माझ्या शक्तीचे आधारस्तंभ आहेत आणि आम्ही एकमेकांना आधार देतो. हे असेच कायम राहू दे!' या फोटोमध्ये कतरिनाच्या बहिणी तिच्यासह लग्नमंडपात येताना दिसत आहे.
याआधी कतरिना-विकीचे मेंदीचे फोटो समोर आले होते. कतरिना आणि विकी मेंदी सोहळ्यात फुलटू धमाल करताना दिसत आहे. दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्व काही सांगून जातो.
मेंदीआधी कतरिना आणि विकी दोघांनीही त्यांच्या हळदी समारंभातील फोटोज शेअर केले होते.फोटो शेअर करताच चाहत्यांकडून प्रेम मिळत आहे. हळदीच्या रंगात रंगलेली बॉलिवूडची नवी जोडी खूपच सुंदर दिसत होती
यामध्ये या नव्या नात्याच्या सुरुवातीबद्दल दोघांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसत आहे. हळदीच्या रंगाने दोघेही प्रेमाच्या रंगात रंगलेले दिसतात. हळदी समारंभात विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांच्यातील प्रेम दिसत होते. कतरिना विकीच्या गालावर हळद लावताना दिसली. फोटो क्रेडिट-@katrinakaif/Instagram