JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट...'; पश्मिना रोशनसोबतच्या नात्यावर कार्तिक आर्यनचा खुलासा

'माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट...'; पश्मिना रोशनसोबतच्या नात्यावर कार्तिक आर्यनचा खुलासा

कार्तिक हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशनला डेट करत असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. अखेर या चर्चांवर कार्तिकने मौन सोडलं आहे.

जाहिरात

कार्तिक आर्यन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 नोव्हेंबर : बॉलिवूड चा हॅंडसम हंक अभिनेता कार्तिक आर्यन ची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कार्तिक त्याच्या कामामुळे तर चर्चेत असतोच त्याचबरोबर तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही सतत चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. सध्या कार्तिक आर्यनच्या डेटिंगबाबात अनेक चर्चा रंगल्या असून सोशल मीडियावर हाच विषय पहायला मिळत आहे. कार्तिक हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशनला डेट करत असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. अखेर या चर्चांवर कार्तिकने मौन सोडलं आहे. झूमला दिलेल्या मुलाखतीत कार्तिक म्हणाला, ‘मला आता समजले आहे की मी एक सेलिब्रिटी आहे आणि माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट चर्चेला येईल. जर कोणाशी मैत्री असेल तर त्यालाही नात्याचे नाव दिले जाईल. अशा गोष्टींमुळे कधी कधी दोन व्यक्तींना त्रास होतो आणि त्यांना समस्यांना सामोरे जावे लागते. पण हळू हळू मी या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकत आहे जेणेकरुन मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करेल.’ हेही वाचा -  लग्नापूर्वीच बाबा, पहिल्या पत्नीपासून घटस्फोट; Arjun Rampal विषयी या गोष्टी माहितीयेत का? कार्तिक पुढे म्हणाला, ‘जेव्हा माझ्याबद्दल वाईट गोष्टी बोलल्या जातात, विशेषत: जेव्हा तसे नसते तेव्हा मला मनापासून दुःख होते. मी आता स्वत: गोष्टींशी जुळवून घ्यायला शिकलो आहे, कारण मला माहित आहे की फिल्म स्टारच्या आयुष्यात वैयक्तिक काहीही नसते. आता मला हे सर्व माहीत आहे.’ पश्मिना ही फिल्ममेकर राजेश रोशन यांची मुलगी आणि स्टार हृतिक रोशनची चुलत बहीण आहे. पश्मिना रोशन देखील लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. ‘इश्क विश्क’ या चित्रपटाच्या सिक्वेल ‘इश्क विश्क रिबाउंड’मध्ये ती दिसणार आहे. काही काळापूर्वी कार्तिक आर्यनचे नाव सैफ अली खानची मुलगी सारा अली खानसोबत जोडले गेले होते. दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जात होते. कार्तिक आणि सारा लव्ह आज कल हा चित्रपट एकत्र करत होते. त्या काळात दोघांच्या प्रेमाचे किस्से सर्वत्र गाजत होते. पण चित्रपट संपताच त्यांचे नातेही संपले.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या सर्वत्र चर्चेत आहे. अभिनेत्याच्या ‘फ्रेडी’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असतानाच त्याचा ‘शेहजादा’ चित्रपटातील फर्स्ट लूकही समोर आला आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये अभिनेत्याचा वेगळा अवतार पाहायला मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या